महाराष्ट्र वेदभुमी

ईद ! आनंदाचा , शांतीचा,एकात्मतेचा प्रतीक.

 


शहानवाज मुकादम/रोहा

 दि:११/०४/२०२४

  आपल्या या जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि त्या  प्रत्येक धर्मात एक दिवस असा असतो ज्या दिवशी त्या धर्माचे लोक अतिशय उत्सहाने आनंद व्यक्त करतात... त्याचप्रमाणे इस्लाम धर्मात सुद्धा आनंदाचे दोन दिवस ठरविण्यात आले आहेत एक बकरी ईद आणि दुसरा म्हणजे ईद उल फित्र. 

  इस्लाम धर्मात पवित्र रमझानचा महिना संपला की चंद्र दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शव्वाल ( इस्लामिक महिन्याचे नाव) च्या ०१ तारखेला ईद उल् फीत्र अतिशय आनंदात साजरी केली जाते...


या दिवशी सर्व लोक  मतभेदे, हेवे दावे विसरून एक मेकांच्या गळ्याला गळा लाऊन एक मेकांना ईदच्या शुभेच्छा देतात. हे दृश्य पाहून असे वाटते जणू त्यांनी आत्ताच एकमेकांशी आपले नवे नाते जोडले आहे. सर्व नातेवाईक जे वर्ष भर आपल्या घरापासून ,गावापासून दूर होते ते ही आपले सर्व काम संपवून ईदच्या दिवशी आपल्या गावी येतात. एकमेकांना सांदन व शिरखुरमा ची मेजवानी देतात.  या सर्व आनंदात चार चाँद तर तेव्हा लागतात जेव्हा गावातील, मित्रपरिवार इतर धर्मीय बांधव मोठ्या आनंदाने, उत्साहाने व हककाने सांदन व शिरखुर्मा पिण्या साठी येतात. तेव्हा खऱ्या अर्थाने ईदचा आनंद दुहेरी होते...

  ईदच्या दिवशी सकाळ पासूनच मुस्लिम मोहल्ले विविध उपकरणाने प्रज्वलित करण्यात येतात .मशिदीवर लायटिंग केली जाते. सकाळी 7 ते 8 वाजता अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी गावा जवळील मोठ्या मैदानात ईद ची नमाज पठण करण्यात येते. तद नंतर प्रत्येक व्यक्ती व लहान मुले आतुरतेने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जातात. प्रत्येक जण मग तो गरीब असो अथवा श्रीमंत असो नवीन कपडे परिधान करून अल्लाहचे आभार प्रकट करीत असते. काही तरुण मंडळी या दिवशी जवळ पासच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. तर कोणी आपल्या घरातच विविध प्रकारे आपले मनोरंजन करीत असतात...

 या सगळ्या गोष्टी बरोबरच ईद सर्व मुस्लिमांना काही संदेश ही देते...

 त्यात प्रामुख्याने काही महत्त्वाचे मुद्दे या लेखात शिक्षण प्रेमी श्री जव्वाद ईस्माईल पेडेकर यांनी लिहिले आहे...

) रमझानचा एक महिना जसे आपण जीवन जगलो त्याच पद्धतीने वर्षभर जगावे. 

२) आपल्या बोलण्यावर ,हातावर, संयम बाळगावा.

३) नेहमी खरे बोलावे.

४)इतरांचे आदर करावे.

५)आपल्या आनंदात इतरांना सहभागी करावे.

६)समाजात नेहमी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी  उपयुक्त असे प्रयत्न करत राहावे. 

७)रमझान मध्ये जशी दीन दूब्ल्यांची मदत करीत होतो तसेच वर्षाच्या बाराही महिने मदत करीत राहण्याचे शिकवण ईद देते.

 असे अनेक संदेश आपल्याला ईद देत असते.

 ईद प्रेम,सद्भावना,आपापसात प्रेम व बंधू भाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा सण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post