महाराष्ट्र वेदभुमी

स्व. तुषार पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त कल्हे येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप




केळवणे पनवेल १० एप्रिल (अजय शिवकर) 

केळवणे गावातील स्व. तुषार भगवान पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त  ११ K.G.S.C. मित्र परिवारातर्फे रा. जि. प शाळा कल्हे येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले...

दोन वर्षापूर्वी ९ एप्रिलला आई एकविरा देवीच्या यात्रे निमित्त मंदिरात दिवस भर सेवा  केल्यानंतर घरी येताना तुषार पाटील यांचे अपघाती निधन झाले..


स्व तुषार पाटील यांच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने रक्तदान शिबिर आयोजित केले होते ते यशस्वी रित्या पूर्ण झाले तसेच या वर्षीही दुर्गम भागातील जे शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्या साठीच ९ एप्रिल २०२४ रोजी रा.जि.प. शाळा कल्हे येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता .  स्व.तुषार  पाटील यांचे नाव वर्षानुवर्ष चालत राहावे या साठी दर वर्षी नवीन उपक्रम करण्याचा नेहमी प्रयत्न केला जाईल असा संकल्प मित्रवर्गाने केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post