उरण ९ एप्रिल (अजय शिवकर )
सध्या सर्व देवांच्या यात्रा,उत्सवांचा काळ चालू आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी आई एकविरेचा सध्या उत्सव सोहळ्याचा कालावधी चालू असल्यामुळे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक नवस फेडण्यासाठी कार्ला येथे दर्शनाला येत असतात...
उरण चिरनेर येथील काही देवीचे भक्त दर्शन करून कारल्यावरून उरंणला येत असताना त्यांच्या रिक्षाला भीषण अपघात झाला...
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोर घाटात सायमाळ दरम्यान रिक्षाचा अपघात होऊन चार जण गंभीर जखमी असल्याचे समजते...
जखमी हे चिरनेर येथील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.
जखमींची नावे..
१)साई बलराम चिरलेकर -वय -२७
२)शकुंतला चिरलेकर
३)सायली चिरलेकर
४)मनिष चिरलेकर
जखमींना उपचारासाठी कलंबोली येथे एमजीएम रुग्णालयात दाखल केले...

