महाराष्ट्र वेदभुमी

पाणी आडवा पाणी जिरवा,उद्देश असणारा तळवडे बंधारा! पाण्याऐवजी पैसे अडवा पैसे जिरवा प्रकारे काम सुरू

 


शहानवाज मुकादम: रोहा 

रोहा:तालुक्यातील मौजे तळवडे येथे गेटड सिमेंट कॉंक्रेट बंधाऱ्याचे काम उप विभाग जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कोलाड याच्याकडून सुरु आहे,

 "पाणी आडवा पाणी जिरवा, असा उद्देश असणारे हे काम आता पाण्याऐवजी पैसे अडवा पैसे जिरवा अशाच प्रकारे सुरू आहे"

या बंधाऱ्याच्या कामाची सुरुवातच नदीतील निघालेल्या डबर चा वापर थेट पीसीसीला वापरण्यात आला आहे.. त्याचवेळी कोलाड विभागाचे उप अभियंता सावंत व अंकिता मॅडम यांनी भेट दिली असता सदरची डबर काढण्यात सांगीतले मात्र  संबंधित ठेकेदाराकडून काही प्रमाणात डबर काढण्यात सुरवात झाली, परंतु जसे उप अभियंता निघून गेले तसे डबर काढणे बंद करुन पीसीसी सुरु केली...

 सदर कामाच्या ठिकाणी नदी कोरडी पडल्याने व नदीला पाणीच नाही...


ह्या बंधाऱ्याचा केवळ खैरेखुर्द आणि तळवडे या गावाला जोडणारा पुल नादुरुस्त असल्याने पावसाळ्यातील पाण्याच्या (पुराच्या ) प्रवाहात वाहून गेल्यास या दोन गावाचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे...

 सदर च्या कामाला पाणी मारण्यात येत नसुन सदर कामाकरीता रेडीमिक्स सिमेंट कॉंक्रेटच्या मालात दगडी पावडर( ग्रिट ) वापरल्याने हे काम निकृष्ट दर्जाचा आहे...

 सदर विषयी खैरेखुर्द ग्रामपंचायतचे सरपंच मुजम्मील गीते व उप सरपंच जुबैर धनसे यांना सुचना देण्यात आली आहे...

  पाणी अडवा पाणी जिरवा’ यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना भाजप-सेना युतीच्या सरकारने तालुक्यातील विविध ओढे, नाले यावर पाणी अडविण्यासाठी बंधारे मंजूर केले आहे...या बंधार्‍यांच्या कामाची गुणवत्ता नसल्याचे दिसून येते...

 सदरचे काम ठेकेदाराकडून उत्कृष्ट दर्जेदार न झाल्यास मृद जलसंधारण विभागाचे प्रभारी उपअभियंता कोलाड आणि जलसंधारण विभाग रायगड यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे माहितीअधिकार कार्यकर्ता महासंघाचे चणेरा विभाग प्रमुख शहानवाज मुकादम यांच्याकडून सांगण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post