महाराष्ट्र वेदभुमी

आदर्श सामाजिक कार्यकर्ता' पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते



सोगाव अलिबाग :अब्दुल सोगावकर  

सुनिल थळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना दिल्या भरभरून शुभेच्छा

सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गुरुवार दि.६ मार्च रोजी संध्याकाळी पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथील झालेल्या भव्य कार्यक्रमात "आदर्श सामाजिक कार्यकर्ता" म्हणून मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन(भाऊ) घाडी यांना त्यांच्या सहपत्नी सह रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व पिल्लई कॉलेजच्या कार्यकारी संचालिका यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. यामुळे मूनवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सचिन घाडी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे. याबद्दल रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांनी गुरुवार दि. ७ मार्च रोजी आपल्या सहकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...

           यावेळी सुनिल थळे यांच्यासोबत ज्येष्ठ गुरुवर्य चांदोरकर सर, सुरेश राऊत, मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्या सानिका घाडी, माजी सदस्य चंद्रकांत खोत, लाईक कप्तान, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, सतिश घाडी, प्रवीण घाडी, रुस्तुम कुर, मुनावर कुर, सर्फराज काझी, अजीज कुर, सूचित थळे, संतोष बांद्रे, मूनाफ बाबा, प्रतीक पाटील, निमिष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते...

        यावेळी सुनिल थळे यांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, सचिन घाडी यांचे सामाजिक कार्य हे खूपच कौतुकास्पद आहे, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वी यांना यापूर्वी कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार मिळाला आहे, तसेच आता 'नवराष्ट्र रायगड सन्मान २०२४' हा पुरस्कार मिळाला आहे, यामुळे आम्ही सर्व मापगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो व त्यांनी आपले सामाजिक कार्य असेच करत रहावे, यासाठी आमचे सहकार्य नेहमीच राहील, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत, यापुढेही असेच पुरस्कार मिळण्यासाठी शुभेच्छा देतो, असे शेवटी सांगितले...

          बहिरोळे येथील ज्येष्ठ गुरुवर्य चांदोरकर सर यांनी सांगितले की, मापगाव पंचक्रोशीतील आम्ही सर्व ग्रामस्थ आनंदात आहोत की, एका छोट्याशा गावातील एक सर्वसामान्य धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी याचे 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, यापुढेही असेच सामाजिक दैदिप्यमान कार्य करत राहो, अश्या शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो, असे सांगितले..

फोटो लाईन : मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना काँग्रेस नेते सुनिल थळे, चांदोरकर सर व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post