महाराष्ट्र वेदभुमी

रायगड भूषण पत्रकार उदय मोरे यांचे दुःखद निधन.



रोहा (विशेष प्रतिनिधी)

 रोहा तालुका तथा मेढा विभाग व मेढा गावातली ज्येष्ठ पत्रकार उदय दत्तात्रय मोरे यांचे गुरूवारी ७ मार्च रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून मोरे परिवारावर दुःखाचे डोंगर तर परीसरात शोककळा पसरली आहे तर त्यांच्या निधनाची सर्वांसाठीच ती एक धक्कादायक बाब आहे.पत्रकारितेमधील एक तळपता तारा फार लवकर वयाच्या 56 व्या वर्षी सोडून गेला त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे उदय मोरे यांचे सर्वांशीच जवळीक वाढली त्यांनी सुरवातीला विविध लेख स्पर्धा कविता स्पर्धेच्या माध्यमातून लेखनाची गोडी निर्माण करत पत्रकारितेला सुरुवात केली.उदय मोरे यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र खूप मोठे होते पत्रकारिता सांभाळून त्याने विविध राजकीय पक्षांमध्ये काम केले तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी राहून उत्तम कार्य केले पत्रकारितेमध्ये त्यांनी अनेक समस्या यशस्वीरित्या हाताळल्या तसेच त्यांच्या या कार्याबद्दल विविध सामजिक संघटनांनी त्यांना पुरस्कार प्रदान करत त्यांचा सन्मान केला पत्रकारितेमधील एक उमदे खेळकर हसरे व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती...

उच्च शिक्षित होतकरू कॉलेज जीवनात त्याने विविध कला क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातुन अनेक पारितोषिक मिळवली तसेच त्यांनी सुरुवातीला विविध मार्केटिंग कंपनीमध्ये तसेच धाटाव एमआयडीसी मधील कंपनीमध्ये काम केले बीकॉम एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि पत्रकारिता तसेच विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्याच्या यशाचा आलेख चढत राहिला सामजिक कार्य आणि पत्रकारिता म्हणून रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा दिला जाणारा रायगड भूषण हा २०१५/१६ चा मानाचा पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेने गौरव केला आणि मेढा गावची शान वाढली ग्रामपंचायतचे उपसरपंच पद सुद्धा त्याने भूषवले होते. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती करून देत गावच्या सर्वांगिक विकासात आघाडी घेतली.तसेच विविध विकास कामांचा पाठपुरावा करण्यासाठी देखील अधिक प्रयत्नशील होते...

मोरे यांचे केवळ रोहा तालुक्यातच नव्हे तर जिल्हा  भरात त्याचा जनसंपर्क होता विविध पक्षांचे राजकीय नेते व्यापारी व मान्यवर नागरिक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्याच्या आकस्मित जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते  अनेक सामाजिक संघटनांवर पदाधिकारी होते...

महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सलग तीन वेळा निवड, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका रोहा चे उपाध्यक्ष होते,  रोहा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष, जय भवानी ग्रामीण बिगर सहकारी शेती पतसंस्था भुवनेश्वर मर्यादित चा वीस वर्षे संचालक सचिव, को. ए. सो. मेढा हायस्कूल चे संचालक , प्रेमचंद नागाजी विद्यामंदिर मेढा चे विश्वस्त, रोहा तालुका शांतता समिती सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती सदस्य अवचित गड प्रतिष्ठान अध्यक्ष विभागीय अध्यक्ष रायगड प्रेस क्लब, मराठी पत्रकार परिषद सदस्य,तसेच मेढा साहित्य कला मंडळचा सचिव म्हणूनही त्यांनी काम केले.अशा एक ना अनेक संघटनांवर त्याने पदाधिकारी म्हणून यशस्वीरित्या कार्य केले..

खूप पुरस्कारही मिळवले त्यातील महत्त्वाचे म्हणजे 2020/21 चा नॅशनल रुल बेळगाव व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी कर्नाटक राज्याचा सामाजिक शैक्षणिक सेवा आंतरराज्य गौरव पुरस्कार, .1998 /99 चा दर्पण पुरस्कार 2009/ 10 चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन चा प्रभाकर पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार रायगड जिल्हा प्रेस क्लब व श्रमिक पत्रकार संघाचा प्रभाकर पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, स्पंदन नाट्यसंस्थेचा २००८ चा स्नेह पुरस्कार व असे अनेक पुरस्कारानी मोरे यांना सन्मानित करण्यात आले आहे...

उत्तम पत्रकार म्हणून त्यांनी दैनिक कृषीवल ,सागर, रत्नागिरी टाइम्स, पुढारी, वादळ वारा, लोकमत, शिवतेज अशा वृत्तपत्रातून लेखन करत सामजिक बांधिलकीतून आपल्या निर्भिड लेखिनितीन समाज घटकाला न्याय मिळवून दिला. तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना महाराष्ट्र कृषक समाज संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. मुंबई गोवा चौपदरीकरण आंदोलनात सहभाग ,आदिवासी बांधवांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्ता ंच्या समस्या सोडवण्यासाठी लिखाण केले, अवचित गड प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा व पत्रकारांचा ही सन्मान केला. अशाप्रकारे मोरे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत युवकांना मार्गदर्शनही करत होते..

उदय मोरे एक यशस्वी पत्रकार म्हणून अखेरपर्यंत कार्यरत राहिला आणि सोशल मीडियाच्याही माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात राहिला.मात्र मधुमेह सारख्या आजाराने ते ग्रासले होते तरीही न डगमगता त्याने खूप काळ यशस्वी झुंज दिली. अखेर पर्यंत पत्रकारितेत काम करणाऱ्या उद्या वर अखेर काळाने अचानक झडप घातलीच आणि पत्रकारीते मध्ये तळपणाऱ्या उदय नावाच्या सूर्याचा आकस्मिक दुःखद अस्त झाला मेढा ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी , पतसंस्था सदस्य,आणि अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त करून शोक संदेश दिला त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई,भाऊ असे मोठे मोरे कुटुंब असून त्यांचे दश क्रिया विधी दिनांक १६ मार्च रोजी मेढा  वाकेश्वर तलावाजवळ होणार आहे तसेच उत्तरक्रिया तेरावे १९ मार्च रोजी राहत्या घरी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post