माणगाव प्रतिनिधी: सिकंदर आंबोणकर
माणगाव तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माणगाव तालुकाप्रमुख श्री. गजानन इंदर अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण" पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री गजानन इंदर अधिकारी यांचा साई सारख्या दुर्गम डोंगराळ भागात शेतकरी कुटुंबात जन्म झाला,अतिशय बिकट परिस्थिती मात करून शिक्षण घेतले लहानपणा पासून सामाजिक कार्याची आवड त्यांना फार होती त्यांनी आपल्या सामाजिक तसेच राजकीय कारकीर्द मध्यें अनेक पदावर काम करुन सामाजिक सलोखा राखला तसेच बहुजन समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांनी प्रधान्य दिले.मु.साई सारख्या दुर्गम डोंगराळ भागात साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ साई या शैक्षणिक सस्थेची आपल्या सवंगडी वर्गाला सोबत घेऊन स्थापना केली;साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई ता. माणगाव-रायगड हे विद्यालय १९९८ साली सुरू करून साई विभागातील आदिवासी, शेतकरी,गरजु,गरीब विद्यार्थ्यांना लाभ मिळावून दिला.आज विद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाली असून अनेक विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत..
त्यानी आज पर्यंत शिवसेना माणगाव तालुका प्रमुख,
माणगाव पंचायत समिती उपसभापती,
क्षत्रिय मराठा समाज माणगाव तळा अध्यक्ष,
जिल्हा अस्पृश्य निवारण समिती रायगड अलिबाग,
साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ साई अध्यक्ष,
अशा अनेक पदावर त्यानी काम केले त्यानी आपल्या समाज कार्याचा उपयोग गरजु गरीब शेतकरी कुटुंबातील लोकांसाठी केला अशा सर्व सामाजिक कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांच्या कडुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सदर पुरस्कार दि.१२/०३/२०२४ रोजी मुंबई ह्या ठिकाणी त्यांना शासनाच्या वतीने प्रदान केला जाणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...
