रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी खारदांडा मुंबई येथे जगतिक मराठी भाषा गौरव आणि जागतिक महीला दिनानिमित्त मराठी साहित्य कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊडेशन यांच्या वतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते...
सदर आयोजित कवी संमेलनात कवी श्री संतोष मोहिते यांच्या मराठी संस्कृती या कवितेसाठी त्यांना सन्मानचिन्ह,सहभाग प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले..
तसेच या कार्यक्रमाचे संस्थापक,अध्यक्ष श्री गुरुदत्त दिनकर वाकदेकर तसेच शोध आनदाचा फाऊडेशनचे अध्यक्ष श्री नितीन सुखदरे उपाध्यक्ष श्री विद्याधर शेडगे यांच्या वतीने कविसंमेलनात सहभाग घेऊन उत्तम सादरीकरण केल्याबद्दल कवी श्री संतोष मोहिते यांना विशेष प्रमाणपत्र, देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला...तसेच पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या...



