पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर )
मुंबई-गोवा हायवे वरील निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयांच्या कामामुळे खाजगी ट्रॅव्हल बसला वाकण नजीक अपघात झाला असुन सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असुन मोठा अनर्थ टळला आहे...
सविस्तर वृत्त असे कि मुंबई- गोवा हायवे वरून कोलाड कडून मुंबई कडे जाणाऱ्या खाजगी ट्रव्हल बस क्रमांक एम.एच.०३ डी. व्ही ७८९१ ही बस वाकण जवळ बाजू काढण्याच्या नादात साईड पट्टीवर आली असता निकृष्ट दर्जाच्या साईड पट्टयामुळे या बसची चार ही चाके या साईड पट्टयात घुसली परंतु ही बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या १५ते २० फूट खोल दरीत पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता परंतु दैव बलवान म्हणून सर्व प्रवासी सुखरूप बचावले...
मुंबई-गोवा हायवे वरील चौपादरीकरणाचे काम गेली पंधरा वर्षा पासुन सुरु आहे. लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे परंतु या महामार्गाचे काम काही पूर्ण होईना ज्या साईडचे काम पूर्ण झाले आहे. त्या रस्त्याच्या साईड पट्टया माती टाकून फक्त भरल्या गेल्या असून खाली दगड गोटे न टाकल्यामुळे या साईड पट्टयां खचत आहेत यावरून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे दर्जाचे आहे हे दिसून येत आहे. यावर कोणाचाही वचक नसल्याने अशा घटना घडत आहेत, उन्हाळ्यात साईड पट्टया खचत आहेत तर पावसाळ्यात याची परिस्थिती काय होईल? हे यावरून दिसून येत आहे. परंतु अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एखाद्या प्रवाश्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल प्रवाशी वर्गातुन केला जात आहे...