प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
तटकरे याना मोठ्या मताधिक्याने पराभूत करणार ! आमदार जयंत पाटील
ज्याने राष्ट्रवादी पक्ष सोडून स्वहित व पैशासाठी निष्ठेला तिलांजली दिली .ते आज सर्वत्र सांगत आहेत की आम्ही पक्ष बदलला तो विकासासाठी परंतु लोकांनी त्यांना प्रश्न विचारावा आपण हा पाठिंबा दिलात तो लोकांच्या हितासाठी होता का स्वतःच्या स्वर्थसाठी भाजपला पाठिंबा दिलात हे प्रथम स्पष्ठ करावे असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.पवार साहेबांनी कार्यकर्त्याची फळी उभारून राष्ट्रवादी पक्ष उभारला आहे .कष्टाने उभा केलेला पक्ष जर कोण बळकावत असेल तर त्याला निती माफ करणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले आहे...
मुरुड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते आपल्या मार्गदर्शन भाषणात बोलत होते.सदरच्या मेळाव्यासाठी शेकाप च्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येनं मोठी गर्दी केली होती...
यावेळी व्यासपीठावर शेकाप नेते आमदार जयंत पाटील,आमदार सुनील भुसारा,माजी आमदार पंडित पाटील,चित्रलेखा पाटील,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया पाटील,विजय गिदी,तुकाराम पाटील,माजी आमदार अनिल तटकरे,मुरुड तालुका काँग्रेस आय अध्यक्ष सुभाष महाडिक,माजी नगरसेवक प्रमोद भायदे,तालुका प्रमुख नौशाद चोगले,माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर,मनोहर बैले,मनोहर मकू आदी सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
यावेळी रोहित पवार म्हणाले की,सिंचन घोटाळ्यात सुनील तटकरे हे गुतलेले आहेत तर गीते यांच्यावर कोणताही आरोप झालेला नाही .तटकरे हे फार हुशार आहेत निवडून येण्यासाठी कोणाचीही मदत घेतली तदनंतर मदत करणाऱ्याला विचारणार सुधा नाहीत .नेते हे लोकांचे भविष बनवणारे असावेत स्वतःचे हित जपणाऱ्या लोकांना धडा शिकवावा असे आव्हान सुधा यावेळी पवार यांनी केले .भाजप सरकारच्या काळात आयएस सेन्टर,हिरे व्यापार,ब्लक ड्रग पार्क अश्या मोठ्या कंपन्या गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुण लोकांना नोकऱ्या कश्या मिळणार.महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले वातावरण असून किमान ३५ खासदार निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी संगितले की, ईडी मुळे भाजप सरकार पडणार आहे .वेळोवेळी सतेसाठी सरकारी यंत्रणा वापरणे हे महाग पडणार आहे.लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असलेले सरकार फार काळ टिकत नाही.
१९७७ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणल्यामुळे सत्ता गमवावी लागली होती तीच परस्थिती भाजप ची होणार आहे. तटकरे याना उमेदवारी जाहीर झाल्याने मी खूप खुश झालो आहे. मला बदला घ्यावयाचा असून मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे शेकाप ने तयार केले आहे.याचा मला आनंद होत आहे.शेकाप ने अनेक स्थित्यतंत्रे बघितली चांगले लोक शेकाप ला सोडून गेले तरी आज सुद्धा हि अलोट गर्दी शेकाप अस्तित्वात असून खासदारकी निवडणुकीत आमची ताकद दिसल्याशिवाय राहणार नाही.फसवणूक केल्याचा बदला या निवडणुकीत घेणारच असा निर्धार यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.कोकणात इंडिया आघाडी ला चांगला निकाल मिळणार आहे.लोक आले गेले परंतु जनमत आमच्या सोबत असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले...
सदरच्या सभेत आमदार सुनील भुसारा व माजी आमदार पंडित पाटील व अनेक मान्यवरांनी विचार व्यक्त केले..
यावेळी शेतकरी कामगार पक्षात विविध भागातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला .सदरच्या सभेसाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शेकडोच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते...