महाराष्ट्र वेदभुमी

साई मंदिर वहाळ येथे आर टी ओ अधिकारी किरण पाटील यांच्या वतीने अन्न दान व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यान


वहाळ उरण १६ मार्च (अजय शिवकर) 

वहाळ येथील प्रसिद्ध साई बाबा मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे स्थान बनले आहे, आजूबाजूच्या परिसरातून कित्येक भक्तगण येवून दर्शनाचा लाभ घेत आहेत...

मंदिरात नियमित काकड आरती, धुपारती, भजन, कीर्तन, तीर्थप्रसाद, यांचा लाभ भक्तांना होत असतो...तसेच दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या धुपारतीनंतर सात वाजता महाप्रसादाचे नियोजन केले जाते...

यासाठी काही वेळेला अन्नदानासाठी मदत काही दानशूर व्यक्तींच्या कडून होत असते...

 गुरुवार १४ मार्च या दिवसाचे महाप्रसादाचे अन्नदान आरटीओ अधिकारी किरण पाटील _पेण  यांनी दिले, तसेच रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त व्याख्यान सुध्दा दिले...

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पार्वती ताई पाटील, विश्वस्त जगन शेठ पाटील, अनंत पाटील, मो. का. मढवी, विश्वास पाटील, एकनाथ ठाकूर आदी सह साई भक्त उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post