महाराष्ट्र वेदभुमी

मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडींच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना शिबिर

 


अब्दुल सोगावकर :अलिबाग

सोगाव : मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या माध्यमातून रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

           या शिबिरात मापगाव येथील भारतीय डाक विभागाचे कर्मचारी श्रीकांत थळकर यांनी मूनवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यासंदर्भात माहिती दिली व या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करीत ग्रामस्थांना मोफत नोंदणी करून दिली, या शिबिरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत नोंदणी करून घेतली. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली...

फोटो लाईन :मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या शिबिराचा लाभ घेताना ग्रामस्थ व मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post