खांब (नंदकुमार कळमकर)
कोकणातील आगळावेगळा शिमगोत्सव सुप्रसिद्ध आहे. पारंपारिक पद्धतीने पुगांव गावात होळी उभारून पूजन करण्यात आले कोकणात शिमगा उत्सव व होळी उत्सवाला मोठा महत्व असून रोहा तालुक्यातील मौजे पुगांव येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला सण हाय होळीचा सण हाय रंग पंचमीचा त्यामुळे शिमगो रंगला गो रंगला लाले लाल अशी लहान बालगोपालांकडून रंगाची उधळण करून होळी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आले,
रोहा तालुक्यातील पुगांव येथे होळी सणाचे औचित्य साधून युवा कार्यकर्ते प्रमोदशेठ म्हसकर यांनी येथील युवकांसाठी पुगांव प्रीमियर लीग पर्व 3 रे यांचे सुंदर आयोजन केले होते तसेच आयोजक प्रमोदशेठ म्हसकर, नारायणराव धनवी, रामदास म्हसकर, घनश्याम बागुल, व बारा संघाचे संघ मालक, सर्व खेळाडू, क्रिकेट क्रीडा प्रेमी पुगांव ग्रामस्थ यांच्या उपस्थित भव्यदिव्य चषकाचे उद्घाटन फाटक्याच्या आतिषबाजीमध्ये कऱण्यात आले तसेच सर्व तरुण युवकाच्या व ग्रामस्थाच्या मनातील हिंदवी स्वराज्य संस्थापक युग पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा स्मारकाचे भूमिपूजन देखील उपस्थीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
सदरच्या आयोजित प्रीमियर लीग मध्ये बारा संघानी सहभाग नोंदवला यात आर्णा इलेवहनचे संघमालक प्रमोदशेठ म्हसकर, आयुष इलेव्हनचे संघमालक दीपक येळकर, रॉयल इलेव्हनचे संघमालक निवृत्ती शेळके, प्रीशा इलेव्हनचे संघमालक प्रशांत शेळके, जे बी पुगांवचे संघमालक प्रशांत कळमकर व विठोबा देशमुख, बाप्पा स्टार बॉईजचे संघमालक आशिष म्हसकर, स्वरांश वॉरियरचे संघमालक रोहित निळेकर, श्री छत्रपती वॉरियरचे संघमालक मनोज म्हसकर, रुद्र इलेव्हनचे संघमालक रोशन झोलगे, संघर्ष इलेव्हनचे संघमालक मिलिंद गोठम व ओमकार सावंत, श्री गणेश पुगांवचे संघमालक सत्यजीत पोटफोडे, श्रीवंश वॉरियर्सचे संघमालक संदेश धूपकर,अशा बारा संघाचे संघ मालक आणि त्यांच्या टीम उपस्थित होते.
शिमगा होळी उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या खेळाला गावातली लहान थोरांचा उत्स्पूर्त प्रतिसाद लाभला होता.तर साखळी पद्धतीने खेळलेल्या खेळातून चार संघाने अंतिम फेरीत प्रवेश तर अंतीम फेरीचा सामना हा आर्णा इलेव्हण आणि बाप्पा स्टार बॉईज पुगांव यांच्यात रंगतदार पहावयास मिळाला तर मोठ्या अटितटीच्या लढतीत अखेर आर्ना इलेव्हन संघाने बाजी मारत अंतीम विजेतेपद पटकावले तर बाप्पा स्टार बॉईज पुगांव संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले, तर स्पर्धेतील तृतीय क्रमांक श्री छत्रपती वॉरियर्स, व चतुर्थ क्रमांक स्वरांश वॉरियर हा संघ मानकरी ठरला.
तसेच प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरला तो भूषण देशमुख, तर उत्कृष्ठ गोलंदाज हर्षद मोरे, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक निखिल कळमकर, तर संघातील मॅन ऑफ द सिरीज ललित म्हसकर यांना आकर्षक चषक व सन गॉगल व स्मार्टवार्च देऊन सन्मानित करण्यात आले. युवानेते प्रमोदशेठ म्हसकर यांच्या कडून या स्पर्धेतील विजेत्यांना चषक देण्यात आले तर उत्कृष्ठ खेळाडू गोलंदाज मालिकावीर यांना यांना सामजिक कार्यकर्ते राम कळमकर साई ऑप्टिकल कोलाड यांच्या कडून बक्षिस प्राप्त झाले होते.सामने यशस्वी होण्यासाठी मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ यांनी ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी अनेक खेळाडूंनी परिश्रम घेतले .