विशेष प्रतिनिधी: रोहा
रोहा : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डीपटू छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र राज्य कब्बडी खेळाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले असे कै.विजय बाबुराव म्हात्रे यांचे गुरुवार १४ मार्च रोजी अचानक निधन झाले त्यामुळे कब्बडी खेळाडूंवर शोककळा पसरली असून त्यानिमित्ताने रोहा तालुक्यातील गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई च्या वतीने त्यांना शोक सभेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ...
आंतरराष्ट्रीय कब्बडी खेळाचा पैलू महाराष्ट्राच्या कब्बडी खेळासाठी अनेकदा कर्णधार म्हणुन मोलाची कामगिरी करून कब्बडी खेळात महाराष्ट्र राज्याला नेहमीच आघाडीवर ठेवले असे महान कब्बडी खेळाडूचा निधन झाल्याने दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भातसई ग्रामस्थानी सभा आयोजित करण्यात आली होती तसेच आयोजित सभेत कब्बडी खेळाचा चमकदार हीरा विजय म्हात्रे याने दोन मिनिटं उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पांजली अर्पण करण्यात आली...
गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसईचे मुख्य प्रवर्तक महादेव वामन म्हात्रे गुरुजी यांच्या उपस्थितीत मंडळाचे सर्व पदाधिकारी,भातसई गाव कमिटी ग्रामस्थ व आजी माजी खेळाडू उपस्थित होते. यावेळी हरिश्चंद्र खरीवले यांनी श्रद्धांजलीपर शोक विचार मांडताना सांगीतले की विजय म्हात्रे याची आपल्या मंडळा सोबत व कब्बडी खेळाडू यांच्या समवेत lआसलेल्या परिचय कसे तयार झाले या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले,तर महादेव म्हात्रे गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करताना विजय म्हात्रे हे कबड्डीपटू कसे तयार झाले. त्याकडे संयम, शिस्त, खेळावर नियंत्रण त्याचा अभ्यास, व्यायाम करणे याच्यावर जस्त भर असायचा त्यांचे वडील बाबुराव म्हात्रे हे सुद्धा मुंबई येथील नामवंत संघात खेळत होते.विजय म्हात्रे हे मध्य रेल्वे संघातून पहिल्यादा खेळत होते त्यानंतर ते महेंद्र अँड महेद्रा संघातुन खेळत होते.त्यांच्या खेळाची उत्तम कार्य म्हणून त्यांना शिव छत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आले .तसेच अंतरराष्ट्रीय कबड्डीचा प्रचार प्रसार करण्यासाठी निवड झाली असल्याचे सांगितले...
तसेच भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमात मोरेश्वर खरीवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की सुधागड पाली, पोटलज, संघात बरोबर कसे जिंकलो पहिला नंबर तसेच वारळ मध्ये पहिला नंबर विजय मिलवला,दिनकर पोळेकर कबड्डीपटू कशाप्रकारे पकड करायला पाहिजे यांचे शिकवण विजय म्हात्रे कडुन शिकाव असे गौवोद्गार काढले, संजय खरीवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझी कोंकण रेल्वे मध्ये व सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये निवड झाली त्याच्या मुळे सात वेळा नॅशनल खेळु शकलो,लिलाधर थोरवे आपले मनोगत व्यक्त करताना माझी रायगड जिल्ह्यातील संघात निवड झाली होती विजय म्हात्रे महादेव म्हात्रे यांच्या मुळेच मी प्रगती करू शकलो विजय म्हात्रे यांच्या निधनामुळे बोर्जे,भातसई, महाराष्ट्र राज्य नाही देशावर कबड्डीपटू वर शौककळा प्रसरळी आहे.या शौक सभेसाठी ग्रामस्थ अध्यक्ष लिलाधर खरीवले,माजी सरपंच गणेश खरीवले,सुरेश कोतवाल, सुहास खरीवले, परशुराम थोरवे, बळिराम थोरवे,किसन कोतवाल,रुपेश खरीवले , हेमंत खरीवले,निवास खरीवले,भरत कोतवाल विळास खरीवले व गावदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसईचे आजी माजी खेळाडू,ग्रामस्थ उपस्थित होते...

