महाराष्ट्र वेदभुमी

किहीम येथील येथे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन,



अब्दुल सोगावकर अलिबाग

काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर व अपक्ष सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या मध्ये रंगली राजकीय जुगलबंदी,

सोगाव : राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ, किहीम आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट सामने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण किहीम येथे गुरुवार दि. १४ मार्च ते १७ मार्च असे चार दिवस आयोजित केले आहेत, या सामन्यांचे १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध मराठी पार्श्वगायक अभिजित मानके व रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले...

              यावेळी किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष किर व सदस्या निधी काठे,जान्हवी वाघे, नूतन थळे, माजी सरपंच प्रशांत दळवी, माजी उपसरपंच प्रशांत नार्वेकर,पोलीस पाटील संध्या काठे यांच्यासह इतर मान्यवर, खेळाडू, क्रिकेट रसिक उपस्थित होते... या चार दिवसीय सामन्यात एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला आहे... सर्व विजेत्या संघांना व खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे...

              यावेळी उद्घाटन करण्याअगोदर क्रिकेट रसिकांना क्रिकेट वरून गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली, तसेच उद्घाटन झाल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला...

         यावेळी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर मनोगत व्यक्त करत असताना राजाभाऊ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम आयोजकांना व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या... यानंतर राजाभाऊ ठाकूर व सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ऐकायला व पाहायला मिळाली, राजाभाऊ ठाकूर यांनी पिंट्या गायकवाड यांच्या गोलंदाजी वर राजकीय चौकार व षटकार लावत पिंट्या गायकवाड यांना विकासकामांबाबत सूचक इशारा दिला, तर अपक्ष किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनीसुध्दा जबरदस्त गोलंदाजी करत गुगली टाकून त्रिफळा उडवला, पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की, जसे प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर होते तसेच माझे देखील राजकीय गुरू गोरगरिबांचे कैवारी स्व. माजी आमदार मधूशेठ ठाकूर असून मी त्यांचा शिष्य आहे, आणि आपल्या कडूनच त्रिफळा उडवण्याची कला शिकून आलो आहे, त्यामुळे मी काही "कमी नाही" असा सांगत गुगली टाकून 'क्लीन बोल्ड' केला... या दोघांच्या जुगलबंदीला मान्यवरांनी व क्रिकेट रसिकांनी हसून दाद दिली...

फोटो लाईन : किहीम येथील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post