महाराष्ट्र वेदभुमी

महायुतीच्या लोकसभा उमेदवाराचे नक्की चिन्ह कोणते असेल ? नागरिकांत चर्चा,रोहयाच्या प्रवेशद्वारी झळकू लागले 'कमळ',


 


रोहा - प्रतिनिधी :- 

शहरात आधीच विकासकांच्या फलकांचा महापूर, त्यात जिथे तिथे कमळाची भर ; सत्ताधाऱ्यांच्या प्रचारास प्रशासनाचा हातभार! 

लोकसभा निवडणुकांचे बिगूल आता कधीही वाजु शकते.त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय राजवट असतानाही विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन होत जागोजागी तसे फलक उभे रहात आहेत. त्यामध्येच अष्टमी नाक्यावर दोन्ही पुलांच्या मध्ये असलेल्या शोभिवंत पुतळ्यावर ' अब की फार फिर मोदी सरकार' अश्या घोषवाक्यासह कमळाच्या फुलाचे चित्र रेखाटले गेले आहे. परिणामी रायगड लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराचे चिन्ह नक्की कोणते असेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे. ..



देशासह राज्यातील राजकारणात कधीही काहीही घडु शकते, त्यामुळे अचानक कमळाचे चिन्ह रोहा शहरात सार्वजनिक जागांवर दिसु लागल्यामुळे उमेदवार घड्याळ वाल्यांचा मात्र त्याचे चिन्ह कमळ असल्यास त्याची तर ही तयारी नाहीना? अशी प्रश्नार्थक चर्चा रोहा शहरात सुरु झाली आहे. आधीच रोह्यात जागोजागी लागणारे विकासकामांचे फलक, त्यामध्ये कमळाच्या फुलांची चित्रे काढण्यास झालेली सुरुवात याकडे निवडणूक आयोग व स्थानिक रोहा नगर पालिका प्रशासन वेळीच लक्ष देत त्याला आवर घालील की सत्ताधाऱ्यांचा प्रचार मोहिमेस हातभार लावेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ..


लोकसभा निवडणूक आचारसंहिता घोषणा कधीही होवु शकते.त्यादृष्टीने प्रशासनासह सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेले दिसत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातही राजकीय वारे जोराने वाहत असून मवीआ ने अनंत गिते यांची उमेदवारी घोषित करत प्राथमिक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे महायुती मधून विद्यमान खासदार सुनिल तटकरे की माजी आमदार धैर्यशील पाटील यापैकी कोण यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. दोन्ही बाजूने परस्पर दावे प्रतिदावे होत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.असे असताना रोहा शहरात आणि तालुक्यात मात्र भाजपाचे कमळ चिन्ह मात्र सार्वजनिक जागांवर रेखाटलेले दिसू लागले आहेत. निवडणूक आचारसंहिते मध्ये मतदारावर  प्रभाव पडु नये यासाठी निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह व राजकीय पक्ष नेते, उमेदवार यांचा नामोल्लेख असलेले फलक हे झाकण्यात येतात. मात्र रोहा शहरात अब की बार मोदी सरकार असे घोषवाक्यासह कमळाच्या फुलांच्या चित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची सुरुवात अष्टमी पुलावरून सुरू होत रोहा बस स्थानकाच्या भिंति पर्यंत हे चित्र पोहोचले आहेत. रोहात सत्ताधारी राष्ट्रवादी विकासात ? आघाडीवर, त्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून शिवसेनेचा ५ कोटी विकासनिधी त्यामुळे आजवर या सर्व विकासकामांचे फलकांनी शहरातील प्रत्येक कोपरा व्यापला असून अगदी कुंडलिका नदी पात्रातही पाट्या लावल्या गेल्या आहेत. आता दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या या कमळाच्या फुलांची संख्या थांबते की वाढते की प्रशासनच त्यांना या प्रचारास वरुन आलेल्या आदेशानुसार हातभार लावतो हे लवकरच समोर येणार आहे...

प्रतिक्रिया ;-

रोहा अष्टमी शहरात चितारण्यात येत असलेल्या घोषवाक्य व कमळाच्या फुला बाबत रोहा मुख्याधिकारी डॉ. पंकज भुसे यांचे कडे चौकशी केली असता शासनाचा असा कोणताही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. यासह यासंबंधी तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे...

रोहा नगर पालिकेने शहराच्या शोभेसाठी लावलेल्या पुतळ्यांवर एकाद्या पक्षाचे चिन्ह लावून प्रचार प्रसिद्धी करने हे कितपत योग्य आहे ? याचा नगर पालिका आणि तालुक्यातील शासकीय प्रशासनाने विचार केला पाहिजे. तसेच यावर तातडीने कारवाई करण्यात आली पाहिजे...

 - प्रशांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते 


- सोबतचे 3 फोटो मेलने

Post a Comment

Previous Post Next Post