माणगाव प्रतिनिधी : सिकंदर आंबोणकर
माणगाव तालुका एज्युकेशन सोसा. संचालित ना.म.जोशी विद्याभवन,गोरेगाव रायगड शाळेमध्ये चित्रकला तासिकेचे शिक्षक श्री मदन नरसिंह शिंदे हे ३४ वर्षे अखंड सेवेमधून दिनांक २९/०२/२०२४ रोजी निवृत्त झाले;त्यांचा सेवा पूर्ती कृतज्ञता सोहळा दि.०२/०३/२०२४ रोजी शिंदे कुटुंबाच्या वतीने, रुक्मिणीबेन मंगल कार्यालय गोरेगाव ता.माणगाव जि. रायगड या ठिकाणी आयोजित केला होता...या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य,कर्मचारी,शिक्षक वृंद,मित्र मंडळी,कौटुंबिक स्नेही,आजी-माजी विद्यार्थी त्याच प्रमाणे राजकीय, सामाजिक लोकांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवली होती...
सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिंदे सरांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मागील दिवसांना उजाळा देत त्यांनी सर्वांनबद्दल कृतज्ञता मनोगतात व्यक्त केली...
