सोगाव : अलिबाग अब्दुल सोगवकर
अलिबाग तालुक्यातील प्रमुख उरुसापैकी एक असणारे मुशेत येथील पिर अहमद शाह बाबा(सय्यद कादिरी शाह बाबा)दर्ग्याचा उरूस शनिवार दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला... या उरुसात हिंदू मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले... यानिमित्त उरुसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा अध्यात्मिक जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता... हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला...
यावेळी विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक कुराणाचे वाचन व पठण करून सर्वांनाच मंत्रमुग्ध सर्व उपस्थितांची मने जिंकली... सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करत त्यांना पारितोषिके देण्यात आली... या कार्यक्रमाला मुशेत पंचक्रोशीतील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मुफ्ती व मौलाना यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन व पठण यावर मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी यामध्ये सातत्य ठेवत अधिकाधिक प्रगती केली पाहिजे, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले...
या कार्यक्रमात मान्यवरांसह व मुशेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
फोटो लाईन : मुशेत येथील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा जलसा कार्यक्रमात उपस्थित मान्यवर,

