केळवणे-पनवेल २९मार्च (अजय शिवकर)
पनवेल तालुक्यातील केळवणे हे उरण पेण पनवेल या तीन तालुक्याला जोडणारे सीमारेषेवरील गाव आहे, एका बाजूला समुद्र खाडी तर तर दुसऱ्या परस्पर दोन्ही बाजूला शहराकडे जाणारा रस्ता, तर दुसऱ्या बाजूला जंगल सत्याग्रह झालेले घनदाट जंगल, गावाच्या सुरुवातीलाच प्रशस्त तळे नंतर विलोभिनीय गावदेवीचे मंदिर, त्यानंतर जंगलाचा रस्ता व नंतर लागणारे डोंगर हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात.
येथील स्थानिक युट्युबर सागर पाटील यांच्या एका डोंगरावरील व्हिडिओने ट्रॅकर पर्यटकांना भुरळ पाडली आणि आणि त्यांनी निश्चय केला की येथील परिसराला भेट द्यावी...
आत्ताच गेल्या आठवड्यात २२मार्च ला ओ एन जी सी हिमालय असोसिएशन ONGC HIMALAYA ASSOCIATION MUMBAI ट्रेकिंग ग्रुप द्वारे केळवणे भवानी डोंगरावर Moonlight Trekking पार पाडण्यात आली...
ही ट्रेकिंग असोसिएशन टीम ४० वर्षापासून संपूर्ण भारताचे सदस्य मिळून आहे, त्यांचा नेहमीच व्यसनमुक्ती आणि सुदृढ शरीर हा उद्देश असतो आणि म्हणूनच ६५ वर्षापर्यंतचे मेंबर हे अजूनही त्याच दमानं ट्रेकिंग करतात...
ग्रुपचे प्रमुख गणेश भोईर यांनी सांगितलं की, आम्ही संपूर्ण भारतभर गड-किल्ले ,डोंगर-दर्या येथे ट्रेकिंग करतो परंतु दिवसा प्रखर ऊन आणि पाण्याचा तुटवडा त्यामुळे रात्रीचे मूनलाईट ट्रेकिंग करतो...
त्या भागातील अभयतांची परवानगी घेऊन स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते उलट त्यांना छान मार्गदर्शन केले जाते...
ट्रेकिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केळवणे भवानी डोंगर भागाचे खूप कौतुक केले...
येणाऱ्या काळात या भागाला पर्यटनाची चालना मिळेल असे त्यांनी सांगितले...