महाराष्ट्र वेदभुमी

खैरेखुर्द कब्रस्तानच्या जुन्याच गटारावर स्लॅब विना स्टीलमध्ये सबंधित अधिकाऱ्यांना अभय कोणाचे?



शहानवाज मुकादम/रोहा दि: 28 मार्च 2024

खैरेखुर्द कब्रस्तानची हद्द भ्रष्टाचार करण्यास मर्जीनुसार बदलल्याने सबंधित अधिकाऱ्यांना अभय कोणाचे?

रोहा तालुक्यात पंचायत समिती सेस फंडअंतर्गत कामातील मुरुम भराव प्रकरण भ्रष्टाचाराचा विषय समोर असतानाच, त्याच खैरेखुर्द कब्रस्तान मध्ये ग्रामपंचायतची हद्द बदलून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश...

 विषेश म्हणजे तेच ग्रामसेवक तेच अभियंता आणि तोच खैरेखुर्द कब्रस्तान मात्र ग्रामपंचायत हद्दी वेगळ्याच असल्याचे ही समोर येते,..

 तरी सदर विषयात पंचायत समिती करुन प्रामाणिकपणा दाखवून सदर कामाची चौकशी अंत कारवाई करण्यात येईल का?...किवा संबंधितांची पाठराखण करण्यात येतो, हे बघाव्यास मिळणार आहे..


सविस्तर, खैरेखुर्द कब्रस्तान येथे गटार दुरुस्ती व स्लॅब चे काम मंजूर आसुन सदर चे काम जुन्याच गटारावर पॉइंटीग करून स्लॅब चे  निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून त्या कामाचे दक्षता व गुण - नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे...

 सदर गटाराच्या स्लॅबच्या कामात स्टील न वापरता  विना स्टील चे स्लॅब आणी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आसुन संबंधित अधिकारी आणी ठेकेदार यांच्याकडून शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करून स्वतःच्याच फायद्यासाठी या निधीतील पैशाचा अपव्यय करण्यात येत असल्याचे समोर आले आहे...

 या कामावर अंदाजपत्रक रक्कम रुपये, 499674/- निधी मंजूर आसल्याची खैरेखुर्द ग्रामपंचायतचे सरपंच मुजम्मील गीते यांनी माहिती दिली तसेच निकृष्ट दर्जेदार कामांच्या बाबतीत संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करणार आसलेचे ही सरपंच गीते म्हणाले...

सदरचे खैरेखुर्द कब्रस्तान नक्कीच कोणाच्या हद्दीत आहे ?ग्रामपंचायत खांबेरे की खैरेखुर्द हा ही प्रश्न उपस्थित होत आहे...खैरेखुर्द ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे यांच्याकडून हद्दी मर्जीनुसार बदलून भ्रष्टाचार करण्याचा पर्दाफाश होत आहे, त्याचे कारण म्हणजेच खांबेरे किवा खैरेखुर्द ग्रामपंचायतीवर कार्यरत असले की त्या प्रमाणेच खैरेखुर्द कब्रस्तानची हद्द बदलून खोटे ठेकेदार, १२ नंबर फॉर्मवर खोटे सह्या ठेकेदाराचे, खोटे इतिवृत्त तयार करून जसा पंचायत समिती सेस फंडअंतर्गत कामात भ्रष्टाचार केला आहे,..

 त्याच प्रकारे खैरेखुर्द कब्रस्तान गटार दुरुस्ती व स्लॅब च्या कामात संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्याकडून शासनाची नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे...

 तरी सदर कामाची दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बोगस कामे  करण्याचा प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी  खैरेखुर्द ग्रामस्थांकडून होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post