महाराष्ट्र वेदभुमी

बामणडोंगरी गावात शिवजयंती साजरी.

 


उरण दि २९(विठ्ठल ममताबादे)

गुरूवार दि.२८/०३/२०२४ रोजी जाणता राजा सामाजिक विकास मंडळ बामणडोंगरी यांच्या विद्यमाने बामणडोंगरी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी टिम जाणता राजाचे दिवंगत सहकारी स्व.धनंजय म्हात्रे आणि स्व.निवास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर संस्थेच्या वतीने आयोजित केले होते. तसेच संध्याकाळी संपुर्ण बामणडोंगरी गावात श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची ढोल - ताशांच्या गजरासह पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुले, महिला वर्ग, तरुण, जेष्ठ नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती कार्यक्रमास राजु मुंबईकर (संस्थापक - CON) आणि त्यांचे सहकारी, माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), रामदास नाईक (तंटामुक्ती अध्यक्ष), सुहास म्हात्रे (अध्यक्ष - शाळा व्यवस्थापन समिती), अमर म्हात्रे (मा. उपसरपंच), विवेक मोकल (शिवप्रेमी), सुंदर म्हात्रे, मंगेशशेठ म्हात्रे, किशोर म्हात्रे, अंकुश म्हात्रे, संजय खोत, किरण म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, मनोज नाईक, चंद्रकांत पाटील, रविकांत म्हात्रे, शिवा म्हात्रे, एन.आर.आय. पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी, उलवे अग्निशमन दल येथील जवान तसेच इतर ग्रामस्थांची  उपस्थिती होती...

   यावेळी संस्थेच्या वतीने अंकित नाईक, सुहास म्हात्रे, सनी ठाकूर, अक्षय पाटील, रुणीत ठाकुर, रमेश नाईक, प्रतिक पाटील, प्रणिल म्हात्रे, समीर नाईक, सुमित म्हात्रे, चंदन म्हात्रे, आकाश भोईर, आशिष ठाकूर आणि अनिकेत ठाकुर यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे सांभाळले...


   रक्तदान शिबिरात ७५ नागरिकांनी  सहभाग घेतला त्यापैकी ४७ जणांना रक्तदान करता आले. नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या सहकाऱ्यांनी बामणडोंगरी गावात येऊन रक्तदान शिबिरास मोलाची साथ दिली.अशा प्रकारे शिवजयंती निमित्त रक्तदान सारख्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक संदेश देत शिवजयंती साजरी करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post