पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील इंदापूर व माणगाव दरम्यानच्या चौपदरी करणाचे काम व बायपासचे अदयाप ही अर्धवट स्थितीत असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असुन यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत असुन यामुळे प्रवाश्यांचा खोलंबा होतांना दिसत आहे...
होळी उत्सवासाठी आलेले चाकरमनी यांचा परतीचा प्रवास, लागोपाठ आलेल्या सुट्ट्या, तसेच सुरु झालेली लग्न सराई यामुळे मुंबई-गोवा हायवे वर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे... परंतु इंदापूर व माणगाव मधील बाय पास रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून अर्धवट स्थितीत असुन या अद्यापही या कामात प्रगती नाही या दोन्ही बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे...
किती ठेकेदार आले किती गेले?रस्त्याचे काम काय मार्गी लागत नाही... महामार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्याकडून फक्त तारीख पे तारीख परंतु महामार्गाच्या कामात कोणतेही प्रगती नाही.यामध्ये ठेकेदारावर प्रशासनाचा नसलेल्या वचक यामुळे फक्त मनमानी सुरु आहे...रोज मरे त्याला कोण रडे! अशीच परिस्थिती असून यामुळे नाहक बळी जात आहे व अनेकांचे संसार उद्योस्त होतांना दिसत आहे याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे...
