प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
न्यू इंग्लिश स्कूल चणेरा ता. रोहा या विद्यालयात एस. एस. सी. शुभचिंतन सोहळा संपन्न झाला... यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यालयात अध्यापन करणारे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करत म्हाणाले की शाळेने जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत अमूल्य अशी शिकवण दिली आहे. शाळेचे ऋण कधीही न फिटनारे आहे. असे आपल्या मनोगतामध्ये सांगीतले...
मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले दहावीच्या परीक्षेला धैर्याने सोमोरे जा, कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका... कठोर अभ्यास करून उज्ज्वल यश मिळवा.आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असून पुढील सहा वर्षे ही आपल्या आयुष्यातील सुवर्ण योग असल्याने जास्तीत जास्त कष्ट करून यशस्वी होण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला...
शाळेच्या व्यासपीठासाठी आर्थिक सहाय्य विद्यार्थ्यानी केले त्याचे मुख्याध्यापकांनी आभार मानले... सहकारी शिक्षक संदीप जाधव, रुपाली जाधव, गणेश नांगरे, अनिल कुंभार, संदीप भुजबळ, होनक गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली...