महाराष्ट्र वेदभुमी

सदाबहार दोस्ती ग्रुपच्या आयोजनातून वीटभट्टी कामगारांना वस्तूंचे वाटप


उरण दि २६(विठ्ठल ममताबादे)

आकाश फाउंडेशनच्या मुंबई सेक्रेटरी संजीवनी ताई शृगारे मॅडम यांच्यातर्फे दिलेले सामान कासारभट वीट भट्टी वर काम करणाऱ्या कामगारांना सदाबहार दोस्ती ग्रुप तसेच सारडे विकास मंचच्या माध्यमातून वाटप करण्यात आले... या कार्यक्रमा प्रसंगी आकाश फाऊंडेशन मुंबई तर्फे दिलेलं साहित्य कासारभट विट भट्टी मधील कामगारांना वाटप करण्यात आले...


यावेळी महिला वर्ग तसेच लहान मुले याना कपडे खाऊ खेळणी चप्पल ब्लँकेट अशा वस्तू वाटप करण्यात आले... कार्यक्रमास  सदाबहार दोस्ती ग्रुपचे हरिश्चंद्र म्हात्रे, संजीवनी म्हात्रे कैलास पाटील, तृप्ती पाटील, तुकाराम गावंड  संतोष जोशी,वैशाली जोशी, विजय गावंड, विजया गावंड, जितेंद्र म्हात्रे,मीना म्हात्रे, सचिन पाटील,  ममता पाटील, कामेश्वर म्हात्रे यांचे मोलाचं सहकार्य लाभले...या कार्यक्रमास सुयश क्लासेस आवरे अध्यक्ष निवास गावंड , सचिन पाटील आवरे, शंकर पाटील आवरे, सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे,रुपाली म्हात्रे, स्नेहीत पाटील  हे उपस्थित होते... वीट भट्टी कामगारांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यात काही वेगळीच मजा अनुभवयास मिळाली... सर्वांचे सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे तसेच तुकाराम गावंड यांनी आभार व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post