महाराष्ट्र वेदभुमी

रा जि प शाळा पाच्छापूर येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न


  

पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर )
     
  विद्यार्थ्यांच्या कळागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा पाच्छापूर येथे शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते...सुधागड तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागात असलेली शाळा ही विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते...
              सदर वार्षिक स्नेह संमेलनास शाळेचे विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा व्यावस्थापन समिती,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.या स्नेह संमेलनात लोकनृत्य, कोळीनृत्य,शेतकरीनृत्य,नाटिका इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यानी पालक वर्ग व ग्रामस्थ यांची मने जिंकली.शाळेचे शिक्षक वृंद अतिशय मेहनत घेतल्यामुळे खुप सुंदर प्रफॉर्मन्स झाले...
                  कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजोलन करून करण्यात आली.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश वारंगे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला... यावेळी पाच्छापूर ग्रामपंचायत सरपंच उत्कर्षा बेलोसे, मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक अभियंता उत्तम डोके,पाली पंचायत समितीच्या माजी सभापती राम शिद,नाडसूर केंद्रप्रमुख कल्पना पाटील, माजी मुख्यध्यापक अनिल राणे,शिक्षक जनार्दन भिल्लारे,रविंद्र हंबीर,धर्माजी तांडेल,खाडे सर,राजु बांगारे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अमिता डिंगले व सर्व सदस्य तसेच या परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर तांडेल सर यांनी केले तर सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक रमेश हरिभाऊ पवार सर,कमलाकर तांडेल, गीता ठुबे मॅडम,भगवान हंबीर सर,धनाजी कोपनर सर यांनी मेहनत घेतली... मान्यवरांचे आभार मुख्यध्यापक रमेश पवार यांनी मानले.सर्व कार्यक्रम मोठया उत्साही वातावरणात संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post