कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे मराठी तडका किर्तन सम्राट महंत हभप सुदर्शन महाराज शास्त्री कारखेल (पाथर्डी-बिड) यांचे गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन येथील ग्रामस्थां कडून करण्यात आले आहे...
रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे श्री शिव शंकर महादेव मंदिर जिर्णोद्धार तसेच नूतन मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना आणि या मंदिराचे लोकार्पण सोहळा रायगडाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे या अनुषंगाने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून समस्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिल्हे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे...
वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या तसेच कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान वै.स्वा. सु. नि. गुरुवर्य अलिबागकर महाराज, वै. स्वा. सु. गुरूवर्य गोपाळ बाबा वाजे,वै. स्वा. सु. गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे श्री शिव शंकर मंदिर जिर्णोद्धार आणि नव्याने मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार असून या प्रसंगी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून प्रसंगी पाथर्डी बिड येथील कीर्तन सम्राट तसेच मराठी तडका झी टॉकीज फेम महंत हभप सुदर्शन महाराज शास्त्री कारखेल यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवा गुरवारी ठिक रात्रौ ९ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.तसेच खांब पंचक्रोशीचे वैभव आदिस्थान गुरुवर्य रायगड भूषण हभप मारुती महाराज कोल्हटकर यांचे सायं ४ ते ५ या वेळेत प्रवचन सेवा होत आहे...
अशा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात विधिवत पद्धतीने मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तसेच विविध भजन पठण प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ,महीला व युवक मंडळ चिल्हे अधिक परिश्रम घेत आहेत...