अब्दुल सोगवकर: अलिबाग
सोगांव :अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथे चोरोंडे चॅलेंजर चषक २०२४ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाने विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला.
येथील जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे यांनी भव्य क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा शुक्रवार दि ९ ते रविवार दि. ११फेब्रुवारी २०२४ रोजी असे तीन दिवस चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला अजित घरत, सुरेंद्र राडे, नितीन अधिकारी, उल्हास अधिकारी व इतर ग्रामस्थांनी सदिच्छा भेट दिली...
यावेळी अंतिम सामना राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघ विरुद्ध गावदेवी मापगाव संघ यांच्यात झाला, यावेळी अटीतटीच्या सामन्यात राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर गावदेवी मापगाव संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच तृतीय क्रमांक गुडलक परहूर पाडा यांनी पटकावले.
यावेळी उत्कृष्ट गोलंदाजचा मान गावदेवी मापगाव संघाचा नितेश राऊत याला देण्यात आला तर उत्कृष्ट फलंदाजचा मान गुडलक परहूर पाडा संघाचा गणेश पाटील याला देण्यात आला, स्पर्धेचा मालिकावीर म्हणून राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाचा ऋषिकेश राऊत याला घोषित करत त्याचा विशेष सन्मान करण्यात आला...
बक्षीस समारंभावेळी सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना राहुल दिलीप भोईर, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, सदस्य विजय भगत, सदस्या स्नेहा रुत, संतोष रुत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी चोरोंडे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे संघाच्या सर्व खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत सूत्रसंचालन व समालोचन निखिल पडते व नदीम वाकनिस यांनी उत्तमरीत्या करत उपस्थितांची मने जिंकली..
फोटो लाईन : जय हनुमान क्रीडा मंडळ चोरोंडे आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या राजा शिवछत्रपती महाराज किहीम संघाला पारितोषिक देतांना मान्यवर,
