महाराष्ट्र वेदभुमी

ज्येष्ठ नागरिक मंडळ उरणचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न.


उरण दि २६(विठ्ठल ममताबादे)

जेष्ठ नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम तसेच जेष्ठ नागरिकांचे वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचे काम जेष्ठ नागरिक मंडळ करत असून या मंडळा तर्फे वर्षभरात विविध वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबविले जातात. 


एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या व सर्वांना सोबत घेउन प्रगती करणाऱ्या जेष्ठ नागरिक मंडळ उरणचा २९ वा वर्धापनदिन समारंभ रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण तालुक्यातील रोटरी स्कुल, बोरी येथे साजरा करण्यात आला...


सदरप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष  हसमुख भिंडे, उपाध्यक्ष अरूण मोदी, सचिव उमेश नाईक आणि इतर सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष  रत्नाकर कुलकर्णी होते.यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण  झालेल्या आणि विवाहाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला.अरूण मोदी आणि उमेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केले...



 सभागृह विनामूल्य दिल्याबद्दल रोटरी स्कुलचे  शेखर म्हात्रे आणि संचालक विकास महाजन यांचे मंडळातर्फे खास आभार मानण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतना चौधरी यांनी केले. एकंदरीत जेष्ठ नागरिक मंडळाचा २९ वा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न  झाला...

Post a Comment

Previous Post Next Post