उरण २७ फेब्रु.(अजय शिवकर)
उरण बस स्थानकाच्या डेपो मध्ये काम करत असताना मंगळवार २७ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता एका सफाई कामगार महिलेचा अपघाती मृत्यू झाला, सदर महिला कलिदा भीमराव शरणागत ही उरण चार फाटा येथे आपल्या कुटुंबासह राहत होती, आपल्या गरीब परिस्थितीमुळे बस-डेपोत सफाई काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होती....
मंगळवारी सकाळी डेपोत काम करत असताना मागून बस रिव्हर्स घेताना तिच्या अंगावर गेली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असे सांगण्यात येते...
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परीक्षण केले आणि अधिक तपास करत आहेत...
गरीब महिलेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र हलहल व्यक्त होत आहे, आणि तिच्या कुटुंबीयांना आर्थिक अथवा नोकरीची व्यवस्था करावी ही मागणी होत आहे..