महाराष्ट्र वेदभुमी

अलिशान सोगांव क्रिकेट स्पर्धेत किट्टू इलेव्हन नवखार संघ अंतिम विजेता



सोगांव -अलिबाग - अब्दुल सोगावकर 

 अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने अलिशान कप २०२४ पर्व ११ वे च्या भव्य रात्रीच्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा दि.२ व ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत किट्टू इलेव्हन संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला...

         या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ऍड. प्रविण ठाकूर यांच्या हस्ते व रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले...या स्पर्धा काळात पहिल्या दिवशी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र घरत, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. तर दुसऱ्या दिवशी प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगाव सरपंच उनीता थळे, अनिता थळे, आयकॉन प्रा.लि. मॅनेजर- हाशिवरे येथील किशोर पाटील, बागदांडा - सुधीर पाटील,  सोगाव मशिदीचे इमाम सद्दाम हकीम, जमातुल मुस्लिमीन सोगाव अध्यक्ष मुरतुजा कुर, नजीर कुर, सोगाव मदिना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मन्सूर कुर, अखलाख वाकनिस, मुंब्रा- ठाणे येथील जुनेद मुकादम, आवास येथील उद्योजक वरद उमरे, मुळे ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद थळे, उद्योजक सतिश म्हात्रे, चोंढी दांडेकर मेडिकल - गिरीष दांडेकर, उद्योजक - नितीन अधिकारी यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

        या स्पर्धेत अंतिम अटीतटीची लढत किट्टू इलेव्हन नवखार व सागरी गणेश थळ यांच्यामध्ये होऊन किट्टू इलेव्हन नवखार संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक १,५०,००० रुपये पारितोषिक व चषक पटकावला तर सागरी गणेश थळ संघाने द्वितीय क्रमांकावर समाधान मानत ८०,००० रुपये पारितोषिक व चषक पटकावले, तसेच तृतीय क्रमांक राजा शिवछत्रपती किहीम संघाने ४०,००० रुपये पारितोषिक व चषक पटकावला.

         या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजचा मान सागरी गणेश थळ संघाचा जयेश लट याने पटकावला, तर उत्कृष्ट गोलंदाजचा मान राजा शिवछत्रपती किहीम संघाचा महेश भोईर याने पटकावला, तसेच स्पर्धेतील मालिकावीर म्हणून किट्टू इलेव्हन नवखार संघाचा अक्षय पाटील याला गौरविण्यात आले...

          या सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट कर्तब दाखवणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अलिशान सोगाव तर्फे आयोजित बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, सातिर्जे ग्रामपंचायत उपसरपंच अँड. उमेश दादा ठाकुर, ज्येष्ठ नागरिक कुतुबुद्दीन कप्तान यांच्याहस्ते व मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, युवा नेता सुचित थळे, बहिरोळे पोलिस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, राजेंद्र घरत व इतर मान्यवर, अलिशान क्रिकेट क्लब सोगाव मंडळाचे अध्यक्ष लाईक कप्तान तसेच मंडळाचे सर्व सदस्य, सोगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. अलिशान सोगाव मंडळाने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले होते, त्याबद्दल सर्वच क्रिकेट संघांनी व उपस्थित मान्यवरांनी तसेच प्रेक्षकांनी अलिशान सोगाव क्रिकेट मंडळाचे आभार मानले...

            या आयोजित स्पर्धेत दोन दिवस सतत काका म्हात्रे सर यांनी स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन केले, तर स्पर्धेत समालोचनासाठी समालोचक म्हणून दोन दिवस काका म्हात्रे, विवेक जोशी, विकास साखरकर, यश मापगावकर, लाईक कप्तान, सुहास फाटक, सुदर्शन घातकी, नदीम वाकनिस यांनी उत्तमरीत्या करत उपस्थित सर्व मान्यवरांची व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तसेच स्पर्धा पाहण्यासाठी येणे ज्यांना शक्य झाले नाही, त्यांना घर बसल्या पाहता याव्यात यासाठी युट्यूब वर थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अलिशान सोगाव मंडळाने व सोगांव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली...

फोटो लाईन :अलिशान सोगाव क्रिकेट स्पर्धेत किट्टू इलेव्हन नवखार संघाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देतांना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post