शहानवाज मुकादम/रोहा
पैसे माफिया लवकरच होणार गजा आड-जाहीद फकजी...
मुरुड:तालुक्यात सामन्य लोकांना पैसे डबल करून देतो किंवा महिन्याला एक लाखाला १५ हजार पर्यंत व्याज देतो असे अमिष दाखवून गोरगरीब जनतेची फसवणूक करण्याचा ट्रेंड आजकाल मुरुड तालूक्यात खूप जोमाने चालू आहे...
या संदर्भात सविस्तर माहिती खुद्द मुरुडचे रहिवाशी जाहीद फकजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्येक महिन्यांपासून अशा पैसे मफियाचा राजरोसपणे खेळ मुरुड तालुक्यातल्या काही गावांनमध्ये तसेच शहरी भागामधे सुध्दा चालू आहे...
पैसे दुप्पट करून देतो किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हनून देतो अशे अमिष दाखवून गोरगरीब व भोळ्या जनतेची फसवणूक जोरदार चालू आहे...
अशा पैसे माफियांचा लवकरच पर्दाफाश करून यांना गजाआड करण्याची पूर्ण शाक्यता दिसून येत आहे...
या माफियांचे पाठ राख काही नेते म॔डळी तसेच प्रशासन अधिकारी करत असल्याची खबरसुद्धा मिळत असल्याचे सांगण्यात आले...
काही काळापूर्वी याच माफियांची १० हजार किमतीची मोटार सायकल घेण्याची लायकी नव्हती तेच आज २५ लाखाच्या आलिशान चारचाकीमध्ये मोठ्या थाटात फिरताना दिसत असून कोटय़वधी रुपयांच्या इमारती यांच्याकडे आहेत..
तसेच लाखो रुपयांची दूचाक्या व जमीनी यांच्या मिल्कतिमध्ये उपलबध आहेत..मुलांच्या लग्नामध्ये पाच हजार लोकांच्या जेवण्याची व्यवस्था व लाखोंचा ऐवज व लाखोंचा खर्च सामान्य जनतेस हैराण करणारा दृश्य, एवढा पैसा अचानक पणे यांच्या कडे कसा आला हे मात्र प्रश्नच सामान्य जनतेस पडत आहे...
या प्रकरणाची प्रशासनामार्फत चौकशी होईल का? आरोपी खरोखर गजा आड होईल का?असा प्रश्न सामान्य जनतेच्या डोक्यामध्ये फिरताना दिसून येत आहे...
नेहमी सारखाच पाखरू पिंजरा सोडुन उडाल्यास नंतर प्रशनास जाग आल्याचे काडीचा फायदा होणार नसल्याचे ही जाहीद फकजी म्हणाले...लवकरच या पैसे माफियांचे भांडा फोड होवून त्यांना गजाआड टाकले जावे अशी जनतेची मागणी जोर धरत असल्याचे ही जाहीद फकजी म्हणाले...
