सत्यप्रसाद आडाव: चणेरा
मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सुवर्ण महोत्सव वर्ष पन्नासावे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी श्री सत्यनारायणाची महापुजा तसेच विविध कार्यक्रमाचे शुक्र. दि. ९ फेब्रु व शनि.दि. १० फेब्रु रोजी आयोजन करण्यात आले आहे...
शुक्रवारी सकाळी ठीक ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच सायं. ४ वाजता भक्तागणासाठी युवा कीर्तनकार ह भ प अजय साळावकर महाराज यांची शृश्राव्य कीर्तनरुपी सेवा, तसेच संध्याकाळी ७ वा. भजनरुपी ईश्वरसेवा स्व - स्वरूप सांप्रदाय भजन मंडळ न्हावे - सोनखार यांचे आयोजित करण्यात आले आहे.. आणि शनि दि.१० फेब्रू रोजी 'होम मिनिस्टर' खास महिलांसाठी खेळ पैठणीचा सकाळी १० ते दुपारी १ वा.पर्यंतचे आयोजन करण्यात आले आहे.. त्यासाठी पैठणी व विशेष १० आकर्षक पारितोषिक महिलांना देण्यात येणार आहे.... तसेच या निमित्ताने मेडिकल फाउंडेशन रोहा व आडाव परिवार न्हावे यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मधुमेह, रक्त तपासणी, ई.सी.जी यासारख्या तपासण्या करण्यात येणार आहेत...
गेली ५० वर्षापासून न्हावे गावचे आडाव परिवार, श्री सत्यप्रसाद आडाव यांच्या जनमापासून या पूजेचे आयोजन करीत आहेत..आपल्या आईने श्री सत्यनारायण महापुजेला पुत्र प्राप्तीसाठी केलेला नवस पूर्ण झाला आणि त्या श्रध्देसाठी ही महापूजा गेली पन्नास वर्षे निरंतर प्रत्येक वर्षी आडाव कुटुंब आयोजित करत आहेत...
सलग दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकानी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती श्री आडाव व कुटुंब यांच्या वतीने करण्यात येत आहे...
