मुरुड प्रतिनिधी: शरद पाटील
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी पर्व दुसरे स्वस्तिक प्रतिष्ठान वाळके यांच्या प्रयत्नातून मा. विद्यमान आमदार महेंद्र हरी दळवी यांच्या मूलभूत सुविधा निधीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.. आणि स्वस्तिक प्रतिष्ठान वाळके यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला...या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले...
ताडवाडी ते वाळके शाळेतील लहान मुलांचे वकृत्व स्पर्धा, पोवाडे,गायन, आणि शिवप्रेमी शिव व्याख्याते मुरुड जंजिरा येथील येथील अनिकेत पाटील यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान झाले.. तसेच ताडवाडी येथील सनी घाग यांचा शिवप्रेमी आखाडा या कार्यक्रमाला केंद्र बिंदू ठरले...आणि वकृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह वा पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला..
तसेच या कार्यक्रमाला भाजपा सरचिटणीस रायगड जिल्हा महेश मोहिते यांनी भेट दिली...

