महाराष्ट्र वेदभुमी

उरण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन संपन्न

 


उरण दि २७(विठ्ठल ममताबादे)

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला... कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जयंती दिवस सबंध देशात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो... महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली... कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य के ए श्यामा होते.. त्यांनी मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्ञानेश्वरी हा सर्वांनीच वाचला पाहिजे असे सांगितले... कारण ज्ञानेश्वरी सांगितलेली जीवनमूल्य दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन केले. व आई आणि बाबा या शब्दांचे महत्त्व विशद केले...


कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दादाराव मस्के (सुप्रसिद्ध लोककलाकार, घाटकोपर,मुंबई)  यांनी महाराष्ट्राच्या लोककलेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले...आंगणीय लोककला आणि प्रांगणीय लोककला, गोंधळ ( जोगवा गीत),तमाशा ( तम-अंधार, आशा-प्रकाश) तमाशाचे प्रकार ( शलमी, ढोलकी, गण, गवळण, रंगबाजी, वग)बतावणी. जागरण, लावणी (पेरणी) पोवाडा इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगून या परंपरा आपण जतन केल्या पाहिजे असे सांगितले व आपल्या मधुर आवाजात त्यांनी लावणी, पोवाडा, गोंधळ इत्यादी विद्यार्थ्यांसमोर सादर केला व सर्वांना मंत्रमुग्ध केले... कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ.पराग कारुलकर (सांस्कृतिक विभाग प्रमुख) पाहुण्यांचा परिचय दिला... यावेळी मराठी भाषा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले... कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. एच.के.जगताप यांनी व्यक्त केले... कार्यक्रमात आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, ज्येष्ठ प्रा. व्ही.एस. इंदुलकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post