पुगांव - रोहा ( नंदकुमार कळमकर )
सोमवार दि.०१ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ५ वा.रोहा विठ्ठल मंदिर येथे EPS-95 पेन्शन धारक यांची विशेष सभा राष्ट्रीय संघर्ष समितीचे सदस्य तसेच नवी मुंबई पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष विनायक तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा मोठया उत्साही वातावरणात संपन्न झाली...यावेळी वेळे अभावी खेड्यापाड्यातील वयोवृद्ध या सभेला मोठया संख्येने उपस्थित राहू शकले नाही तरी जवळ पास ७० एक पेन्शन धारक उपस्थित होते.
यावेळी वसंत शेलार यांनी या सभेसाठी आलेल्या मान्यवरांचे तसेच सर्वच उपस्थितांचे शब्द सुमनाने हार्दिक स्वागत केले. देवराम कर्णेकर,नंदकुमार भादेकर,दगडू बामुगडे,वसंत शेलार यांनी मान्यवर यांना शाल श्रीफळ देऊन हार्दिक स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दगडू बामुगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिल्ली येथे आंदोलन/उपोषणाला बसलेल्या पैकी तसेच आज पर्यंत काही ज्ञात अज्ञात पैकी स्वर्गीय झालेल्या सहकार्यांना सर्वांच्या वतीने भाव पुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यांत आली. तसेच पूढे मा.तेंडुलकर यांनी सांगितले की आपल्या पेन्शन वाढीसाठी सध्या दिल्ली येथे रामलिला मैदानात आपले राष्ट्रीय संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष (कमांडर) मा.अशोकजी राऊत,NAC कमिटी,व हजारो वयोवृद्ध पेन्शन धारक यांच्या समवेंत आमरण उपोषणाला बसले आहेत.पेन्शन वाढ वाटचालीसाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांजकडे तसेच संसदे मधे झालेल्या विषयीचे विश्लेषण सविस्तर भाषेत सांगून मार्गदर्शन केले.उपस्थितां कडून आलेल्या शंकेचे व्यवस्थित पणे निरासन करून आपल्याला पेन्शन वाढ हि होणारच अशी आशा व्यक्त केली. तसेच पेन्शन वाढ होईपर्यंत आपली NAC कमिटी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार...फक्त यासाठी आपल्या सर्वांच्या साथीची,आशिर्वादाची गरज आहे...
एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
या विषयी उपस्थितांचे समाधान झाल्याने सर्वांनीच मान्यवरांचे तसेच मिटींग आयोजक नियोजकांचे शब्द सुमनाने आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री.दगडू बामुगडे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने मान्यवरांचे तसेच सर्वच उपस्थितांचे आभार मानुन सभा संपल्याचे जाहीर केले...
