शहानवाज मुकादम/रोहा. दि:०१/०१/२०२४
रोहा पोलीस ठाण्यात २०२४च्या नवीन वर्षात पहिलाच गुन्हा दाखल...
रोहा : तालुक्यातील सुडकोली गावात शुल्लक कारणावरुन दोन गटात वाद होऊन त्याचे पडसाद हाणामारीत उमटले...ही घटना रविवारी दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री घडली असून याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
दि:३१/१२/२३, रोजी रविवारी रात्री २२.४५वा.च्या सुमारास सुडकोली गावात वार्षिक नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करणे कामी मिटींगमध्ये सेक्रेटरी पदाची नियुक्ती करीत असताना फिर्यादी जावेद युनुस भुरे वय ४२ वर्ष यांना आरोपी फैयाज घारे यानी वाद निर्माण करून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी याने फिर्यादीच्या आंगावर धावत जावून लाथ मारली, फिर्यादीस शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी देत हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने फिर्यादी व साक्षीदार यांचे कमरेला पाठीत व छातीत मुक्का मार लागल्याने आरोपी फैयाज घारे वगैरे ९ यांच्याविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
तर, दुसऱ्या गटाकडून फिर्यादी अक्रम अस्लम मेमन वय २४ वर्ष याने रोहा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे... त्यानुसार रविवार दि:३१/१२/२३, रोजी रात्री २२.४१ वा. च्या सुमारास फिर्यादी साक्षीदार व आरोपीत हे त्यांचे गावाची नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करणे कामी जमलेल्या मिटींगमध्ये आरोपी यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताबुक्याने मारहाण करून खांद्यावर पाठीवर चाकूने वार केल्याने दुखापत झाली आहे.
सदर प्रकरणी आरोपी अब्दुल रेहमान भुरे वगैरे ९ ,तसेच आरोपी फैयाज घारे वगैरे ९ अशा दोन्ही गटा विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे...दोन्ही गुन्ह्यांचा तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात पोहवा/७७३ महेंद्र शिद करीत आहेत...
