महाराष्ट्र वेदभुमी

स्वप्नील वारकर यांचे दुःखद निधन


पुगांव - रोहा (नंदकुमार कळमकर ) 

रोहा तालुक्यातील गोवे गावचे रहिवासी स्वप्नील वसंत वारकर यांचे बुधवार दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी अतिशय तरुण वयात दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३३ वर्षाचे होते. ते अतिशय प्रेमळ व कष्टाळू स्वभावाने सर्वाना परिचित होते.ते आंबेवाडी नाका येथे भाजी व्यवसाय करीत होते...

 त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबासह गोवे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ,भावजय,दोन बहिणी,पुतणे व मोठा वारकर परिवार आहे...त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.५ जानेवारी तर उत्तर कार्यविधी रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी त्याच्या गोवे येथील निवास्थानी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post