पुगांव - रोहा(नंदकुमार कळमकर)
हुतात्मा विरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्या वतीने मंगळवार दि. २/१/२०२४ रोजी आंबेवाडी कोलाड ग्रामपंचायत कार्यालयात मोठया उत्साही वातावरणात करण्यात आली होती... आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे सर्व समाज बांधवांनी पुजन करून भाई कोतवाल यांना आदरांजली वाहिली. तसेच या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेशदादा महाबळे यांनी भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रविण पवार,सुधीर खराडे, संजय सकपाळ, निलेश खंडागळे, विजय खराडे, किरण खराडे, एकनाथ मोहिते, निलेश पवार, जितेंद्र जाधव, रोहिदास मोहिते, चंद्रकांत हुजरे, उत्तम साळूंखे, तसेच असंख्य समाज बांधव उपस्थित होते...
