महाराष्ट्र वेदभुमी

विरझोली गावामध्ये सर्वत्र ठिकाणी साफ सफाई


भाग्येश घोसाळकर रोहा

घोसाळे विभागातील मराठी युवा उद्योजक श्री राजूदादा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त 

विरझोली गावचे सुपुत्र युवा उद्योजक एक आदर्श युवा नेतृत्व आणि आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे समाज सेवेची जाण असणारे श्री राजुदादा धुमाळ तडपदार युवा कार्यकर्ते, घोसाळे विभागामध्ये सर्वांचेच आवडीचे...गेली अनेक वर्षे  व्यवसायामध्ये पुढे येऊन जिद्दीने स्वतःला सिद्ध करून दाखवणे व विरझोली गावचे नाव खूप पुढे नेण्याचे काम करणारे आणि  संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व युवकांमध्ये एक आदर्श निर्माण करून देणारे....युवा उद्योजक श्री राजुदादा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विरझोली येथे स्वच्छता अभियान करताना विरझोली येथील नवनिर्वाचित युवा सरपंच प्रदीपसाहेब कुंडे माजी सरपंच संजयसाहेब नाकती मराठी युवा उद्योजक राजू कांबळे माजी उपसरपंच नितेश बैकर , गणेश धुमाळ व मित्रपरिवार

Post a Comment

Previous Post Next Post