महाराष्ट्र वेदभुमी

कोकण युवा सेवा संस्था रजि ध्यास समृद्ध कोकणचा



विशेष प्रतिनिधी- श्रीवर्धन

रक्तदान हेच श्रेष्ठदान

कोकण युवा सेवा संस्था आयोजित रक्तदान शिबीर दि १४/१/२०२४.रोजी संपन्न झाला...त्यासाठी नागरिकांनी चांगला.प्रतिसाद दिला...जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल  कु. अभिजीत द कोटकर संस्थापक/अध्यक्ष कोकण युवा सेवा संस्था यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, मी   आपला अत्यंत ऋणी आहे... तसेच समर्पण रक्तपेढीचा देखिल ऋणी आहे... कारण तिथे आल्यानंतर जे आम्हाला आपण सहकार्य व मार्गदर्शन केलेत ते अनमोल आहे... 

आतापर्यंत आपण रक्तदान केले...पण आपल्या गरजेवेळी आपल्याला रक्त  मिळावे या आशेवर रक्तदान करत होतो... पण रक्तदान का करावे आणि कशासाठी करावे याचा उलगडा मात्र.प्रत्यक्ष आज झाला... कारण आम्हाला माहीतच नव्हते की नेमकं थँलेसेमिया आहे तरी काय? पण आपण जे अमूल्य मार्गदर्शन केलेत त्यामुळे कळले की तो नेमका आजार तरी काय आहे? आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? म्हणूनच संस्थेचे उपसचिव श्री.अनिल गावडे यांनी सांगितले होते की रक्तदान केल्यावर आपणास कळेल की आपण केलेलं जे रक्तदान आहे ते  कोणाच्या कामी येते आणि ते कळल्यानंतर तुम्ही स्वतः तिथे ३/४ महिन्यांनी जाऊन स्वतःहून रक्तदान करून याल...आणि त्यांच्या या वक्तव्यावर विश्वासाने सांगू इच्छितो की , कोकण युवा सेवा संस्था दर ३/४ महिन्यांनी असेच रक्तदान शिबीर आयोजित करेल...आणि ते ही समर्पण रक्तपेढी सोबतच करेल...तसेच इतर संस्था, ग्रुप आणि प्रतिष्ठान यांना आवाहन करतो की, एक तरी रक्तदान शिबीर समर्पण रक्तपेढी सोबत राबवा...


Post a Comment

Previous Post Next Post