महाराष्ट्र वेदभुमी

मोहन पारसनीस व सहकाऱ्यांनी जिंकली रोहेकरांची मने .

प्रतिनिधी :- शुभ्रा आडाव चणेरा 

ब्राह्मण मंडळ रोहा आयोजित सांगितिक मैफिलीस उदंड प्रतिसाद 

 रोह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी रात्रौ ९:३० वा.भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या भट सभागृहात सर्व रोहेकर बंधु भगिनींसाठी स्वरसाज या जुन्या हिंदी गीतांच्या सांगितिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले. रोहेकर नागरीकांनी सदर मैफीलीस उदंड प्रतिसाद दिला...

   पुण्यातील नामवंत तबला वादक तसेच संगीत संयोजक मोहन पारसनीस व सहकारी कलाकारांनी अत्यंत ताकदीने पेश केलेल्या विविध गाण्यांनी रोहेकरांची मने जिंकली... 

सुमारे अडीच तासांहून आधिक वेळ रंगलेल्या या मैफिलीने रोहेकरांचे कान व मन दोन्ही त्रुप्त झाले असल्याची प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी व्यक्त केली...

          शशांक दिवेकर व श्रुती देवस्थळी या दोन अत्यंत गुणी गायकांनी गायलेली सदाबहार गाणी , स्नेहल दामले यांचे उत्कट निवेदन , सांगितिक मैफिलिमध्ये अभावानेच वाजवले जाणारे अकॉडियन व ऑक्टोपॅड ही  वाद्य , तबला पेटीची सुरेल साथ यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.. 

           ब्राह्मण मंडळ रोहा रौप्य महोत्सव समिती समन्वयक किशोर सोमण यांनी स्वागत व परिचय करून दिला तर मंडळाचे सचिव निखिल दाते यांनी आभार प्रदर्शन केले...

              कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष अमित आठवले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कमिटी सदस्य व रौप्य महोत्सव समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post