अब्दुल सोगावकर अलिबाग
सोगांव: दि.९जानेवारी, श्री साईधाम पालखी यात्रा सेवा संस्थेची रांजणपाडा ते शिर्डी साईबाबांची पालखी पायी वारीचे रविवार दि.८ जानेवारी रोजी सालाबादप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या ऊर्फ प्रसाद गायकवाड यांनी चोंढी येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीची भोई वाहत आपल्या चोंढी येथील कार्यालयाजवळ भव्यदिव्य असे पालखीचे स्वागत केले.
यावेळी सर्व साईभक्तांना सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यातर्फे चहापाणी व अल्पोपहार देण्यात आला, यानिमित्ताने साईधाम कमिटी रांजणपाडा यांनी पिंट्या गायकवाड यांचा सन्मान व सत्कार केला. याकार्यक्रमाला पिंट्या गायकवाड यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, ओंकार आमले, आत्माराम साळुंखे, आसिफ मलिक, छाया म्हात्रे, सासवणे ग्रा.पंचायत सदस्या संजना पाटील, पंकज भोईर, विनोद भोईर, सुबोध काठे आणि रोहिणी भोईर, निवेदिता भोईर तसेच मित्रपरिवारातील कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले व साईभक्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पालखीचे प्रस्थान केले...
फोटो ओळ: चोंढी येथे पालखीची भोई घेऊन भव्य स्वागत करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित त्यांचे कुटुंबीय तसेच इतर मित्रपरिवार,
