अब्दुल सोगावकर अलिबाग
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगांव येथील ग्रुप ग्रामपंचायत मापगांवचे माजी सरपंच स्व.प्रभाकर दाजी पाटील यांचे धाकटे बंधू ज्येष्ठ समाजसेवक स्व. पद्माकर दाजी पाटील, (वय ८३) यांचे सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले... त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्माकर पाटील यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशपिंड कार्य बुधवार दि. १० जानेवारी रोजी होणार आहे, तर उत्तरकार्य शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी मापगाव येथील राहत्या घरी होणार आहे...
कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे...
