शहानवाज मुकादम/रोहा
रायगड, दि:१०/०१/२४ (जिमाका) देशातील आदिम जमातीच्या सर्वागीण विकासाकरिता मा.प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN ) या योजनेचा कार्यान्वयन केला आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील चिंचवली मंडळातील मौजे भूतिवली येथील रा.जि.प. शाळा भूतिवली येथे कर्जत तहसिल कार्यालयाच्या वतीने (दि.09 जानेवारी 2024) रोजी सकाळी 10.00 ते सायं. 04.00 या वेळेत आदिवासी बांधवांसाठी विविध दाखले वाटप शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच दाखले घेण्यासाठी भूतिवली व आसल येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिबिराअंतर्गत 29 जातीचे दाखले, ११ उत्पन्न दाखले, १४ संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले.
या शिबिरास कर्जत तहसिलदार डॉ.शितल रसाळ, मंडळ अधिकारी श्रीम.वैशाली पाटील, तलाठी अनिल कांबळे, दत्ता ठोकळ, प्रवीण साळुंखे, श्री.खोडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक श्री.काळे, आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे व इतर ग्रामपंचायत सदस्य, श्री.निरगुडा ग्रामसेवक, श्री.लदगे BLO, हे उपस्थित होते.
