राममंदिरच्या जागी राष्ट्रीय स्मारक बांधा:बाळासाहेब ठाकरे
हृदयात राम आणि हाताला काम... शिवसेनेची भूमिका
शिवसेनेने सर्वात आधी दिला १ कोटीचा निधी
ट्रस्टवर राम मंदिर आंदोलन चालवणारे ओबीसी नाहीत...
प्रवीण कोळआपटे- पनवेल / महाड / रोहा
सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेतून निर्माण झालेल्या शिवसेना या संघटनेने प्रथम भूमिपुत्र आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काम केले... शिवसेना हिंदुत्वाकडे प्रबोधनकार ठाकरेंच्या मृत्यूनंतर म्हणजेच १९८७ सालानंतर वळली...बाळासाहेब ठाकरेंवर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा बहुजनत्वाचा बराच पगडा होता... शिवसेनेने सुरुवातीला हिंदुत्व स्वीकारल्यानंतर त्यातून ब्राम्हणत्व मोठे होत असल्याचे त्यांना दिसले... हिंदुत्वाच्या आडून एकट्या ब्राह्मणवादाचा फायदा होऊ नये यासाठी शिवसेनेने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व... ही भूमिका घेतली... शिवसेनेच्या हिंदुत्वात १८ पगड जातींबरोबरच मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक धर्मियही येतात... शिवसेनेला शेंडी-जानव्याचे हिंदुत्व अजिबात मान्य नव्हते... बाळासाहेब तसे बोलून दाखवायचे... आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेही तेच बोलत आहेत... त्यामुळे राममंदिराबाबत बाळासाहेबानंतर हृदयात राम आणि हाताला काम... अशी शिवसेनेने भूमिका घेतली...
सुरुवातीला शिवसेनेची मदत घेऊन भाजपने महाराष्ट्रात हातपाय पसरले...आरएसएस प्रणित भाजपने बाळासाहेबांच्या काळातही शिवसेनेला फार त्रास दिला...आता तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर भाजपने शिवसेना फोडण्याचे काम केले... राममंदिर आंदोलन वाढविण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे... शिवसेनेमुळेच भाजपला सत्तेची राजकीय पोळी भाजता आली... बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नव्हते... स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी... बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा गर्व आहे...असे जर-तर मध्ये विधान केले होते... बाबरी पतनानंतर देशभरात हिंदू मुस्लिम दंगे झाले...फक्त लालूंच्या बिहारमध्ये हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही... दंगलीने देशाची करोडो रुपयांची हानी झाली... दंगलीनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले... यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन होऊन शिवसेना -भाजपची सत्ता आली ... त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येतील राममंदिरच्या जागी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करून त्याला मंगल पांडेचे नाव द्या...असे जाहीर विधान केले होते...देव,धर्म याबाबत बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते... हे विचार त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर बिंबवले होते... देवळे बांधून देशाच्या समोरचे प्रश्न सुटणार नाहीत ...हे बाळासाहेबांना माहित होते... त्यामुळेच ते प्रत्येकाने आपला धर्म घरातच जपावा... बाहेर रस्त्यावर आणू नये... असे म्हणायचे...
एकदा पुणे येथील जाहीर सभेत... जगात देव नाही तर आई -वडील हेच आपले देव आहेत... असे विधान बाळासाहेबांनी केले होते.. तसेच शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन बनविण्यास बाळासाहेबांनी विरोध केला होता...शेतकरी आत्महत्या करीत असताना साईबाबांना सोन्याचे सिंहासन कशासाठी? असा जाहीर सवाल बाळासाहेबांचा होता ... त्यावेळी बाळासाहेब आणि दैनिक लोकमत यांच्यात वैचारिक द्वंद्व झाले ... लोकमतने बाळासाहेबांच्या मातोश्रीतील सिंहासनाचा विषय काढला... त्यावर बाळासाहेबांनी सदर सिंहासन लोकमतला पाठविण्याची तयारी केली... तशी कृती सुरु असताना लोकमतने थेट मातोश्रीत येऊन नाक घासून माफी मागितली...बाळासाहेबांची हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबाबत भूमिका स्पष्ट होती...त्यामुळेच राममंदिर उभारण्यासाठी बाळासाहेबानंतर शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात आधी १ कोटीचा निधी दिला... हा इतिहास आहे...शिवसेनेने राम मंदिराबाबत जी आंदोलने चालवली... ती ओबीसींच्या सहभागाने .... शिवसेनेचे सर्वात जास्त पदाधिकारी आणि मतदार हे ओबीसी आहेत... मात्र त्याच ओबीसींना राममंदिर ट्रस्टवर घेण्यात आलेले नाही... राममंदिर भाजपने आता स्वतःची खाजगी प्रॉपर्टी बनविली आहे... त्यामुळे प्रथमपासून योगदान देणाऱ्या शिवसेना आणि ओबीसीला दूर ठेवले ...याची जनतेत चीड आहे... त्यामुळे भाजपने कितीही धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुकीत प्रभू श्रीरामाच्या कृपेनेच त्यांचा पराभव होणार आहे... जनतेने तसे ठरवले आहे... लोक उघडपणे सोशल मीडियावर बोलत आहेत...
