महाराष्ट्र वेदभुमी

कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व महिलांच्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण व्हावा ; ना. आदिती तटकरे

 


प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा 

कार्यक्रमास विशेष आकर्षण 'भाग्य दिले तू मला" या मालिकेतील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तन्वी मुंडले

हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी

वर्षातील बारा महिने महिला आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतात. वर्षातील मोजकेच दिवस सोडले तर बाकी उर्वरित दिवस असेच निघून जातात. हळदी कुंकू कार्यक्रम फक्त हळदी कुंकवापर्यंत मर्यादित न राहता आपल्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण व्हावा, जो तुम्हाला वर्षभर एक आनंदाचा क्षण म्हणून लक्षात राहील यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, आदि "ती"  महोत्सवात "ती" म्हणजे महिला,  "ती" चा सत्कार व्हावा जो वर्षभर एक आनंदाचा क्षण म्हणून लक्षात राहील असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.



              रोह्यातील कुंडलिका नदीसंवर्धन पार्किंग पटांगण येथे खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री कु.आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा अष्टमी व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदि "ती" महोत्सव आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. तटकरे बोलत होत्या. एक दिवस महिलांना कुठल्याही प्रकारच्या जबाबदारीची परवा न करता मनमोकळेपणाने आनंद घेता यावा. हाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न आहे असे सांगत मकर संक्रातीच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तुमचे आयुष्य सुख समृद्धी आनंदी भरभराटी जावो अशी अपेक्षा ना.आदिती तटकरेंनी यावेळी व्यक्त केली.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योत सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            यावेळी सौ. वरदाताई तटकरे, सिने अभिनेत्री तन्वी मुंडले, जिल्हा महिला सरचिटणीस सौ. रत्न्प्रभा काफरे, तालुकाध्यक्ष प्रीतम पाटील, शहराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, मा. नगरसेविका पुजा पोटफोडे, शिल्पा धोत्रे, श्रद्धा पाटणकर, सरोजनी शिंदे, अड. मयुरा मोरे, स्वरांजली शिर्के, रविना मालुसरे,  विभा चोरगे, महेंद्र गुजर, अमित उकडे, महेंद्र दिवेकर, राजू जैन, रविंद्र चाळके, मजीद पठाण, चंद्रकांत पार्टे, आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

               आदि "ती"  म्हणजे आपण सगळ्याजनी आहोत आणि आज "ति"चा सत्कार तिचा सोहळा आहे,  काही लोकांना वाटत असेल आदिती म्हणजे आदितीचा सत्कार आहे असे नसून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, सर्व महिलांसाठी आहे. असे सौ. वरदाताई तटकरे यांनी सांगितले. चूक की बरोबर नंतर बघू, पण आपले मत काहीतरी असले पाहिजे, तेव्हा आपण आपल्या स्वप्नांसाठी इच्छांसाठी लढू शकतो,  मालिकेत नायिकेवर कितीही संकटे आली, कितीही दुःख आले तरी नायिका कधी कोळमळत नाहीत, ती पुन्हा उभी राहते आणि शेवटी तिचाच विजय होतो हे कायम आपल्या मनात ठेवून हेच विचार घेवून आपण पुढे गेलो पाहिजे असे अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post