उरण ३० जाने.(अजय शिवकर)
उरण एसटी डेपो नागरिकांना प्रवाशी सेवा करण्यात नेहमी अग्रेसर राहिली आहे...महालण सभा फुंडे हायस्कूलचे माजी विद्यार्थी आज ज्येष्ठ नागरिक आहेत...अशा ज्येष्ठ नागरिकांना नढाळ, देहू,आळंदी पंढरपूर, जेजुरी या तिर्थक्षेत्रांना भेटीचा आनंद दिला, असे सहलीच्या आयोजिका श्रीमती सीता दत्ता कडू आणि नर्मदा गंगाधर म्हात्रे या ज्येष्ठ महिलांनी सांगितले...
हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक जयवंत पाटील म्हणाले की " आम्ही माजी विद्यार्थी आमच्या एकाच वर्गातील विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांना घेऊन ४३ वर्षे विविध तिर्थक्षेत्रांना सहलींचा आनंद घेत आलेले आहोत... म्हातारपणी एसटी गाडीची सोय झाल्याने आम्ही कमी खर्चात भरपूर आनंद घेतला आहे...
डेपो व्यवस्थापक माचले यांनी आम्हा ज्येष्ठांना विशेष सहकार्य केले," अशा शब्दांत डेपो व्यवस्थापक माचले यांचे आभार मानले...
