अब्दुल सोगावकर:अलिबाग
सोगाव :अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव यांच्या माध्यमातून मूनवली येथील ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या पुढाकारातून मूनवली येथील अनमाने आळी येथील गल्लीतील गटार पाईप टाकून गटार बांधणी व मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या गटार दुरुस्ती, चिंतामण पाटील ते मुख्य रस्त्याच्या लगत गटार पाईप व काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवार दि. २५ जानेवारी रोजी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या उपस्थितीत मूनवली येथील ज्येष्ठ नागरिक गोविंद अनमाने व आत्माराम पंडम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.
यावेळी मापगाव ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, संतोष बांद्रे, संजय अनमाने, सुधाकर ठकरूळ, मधुकर सूद, गंगाराम ठकरूळ, सुप्रिया ठकरूळ, नंदिनी नागावकर, वर्षा अनमाने, गीता अनमाने, प्रतिक अनमाने आदी ग्रामस्थ व मूनवली महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या...
फोटो लाईन : मूनवली येथे अनमाने गल्ली व मुख रस्त्याच्या लगत गटार, चिंतामण पाटील यांच्या घराजवळच्या गटार कामाचे भूमिपूजन करताना सुनिल थळे व मान्यवर तसेच उपस्थित ग्रामस्थ,
