महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रवादीला खिंडार... शिंदेगटात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश,


शहानवाज मुकादम/रोहा-

आमदार महेंद्रशेठ दळवी यांची चणेरा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जोरदार एंट्री!

परिवर्तन विकासाचे कार्यकर्ते मेळाव्यात शिंदेगटात पक्ष प्रवेश, 

 रोहा: तालुक्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आसलेल्या चणेरात शिवसेना शिंदेगटाच्या परिवर्तन विकासाचे कार्यकर्ते मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीला खिंडार.

दि:२८/०१/२४, रोजी चणेर्यात आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वात परिवर्तन विकासाचे कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला असून चणेराविभागातील खारीपासुन ते पारंगखार पर्यंतचे नागरिक उपस्थित  असुन आमदार महेंद्र शेठ दळवी आणि रोहा तालुका प्रमुख ऍड मनोजकुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून खोट्या आश्वासनांवर पूर्णविराम लावत मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदेगटात पक्ष प्रवेश केला आहे...


या मेळाव्यात राजिपच्या माजी सदस्या वैशाली सिनकर मॅडम यांनी आपले बंधू आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा चणेरेच्या वतीने स्वागत केले, तसेच राजकीय संबंध बाजुला ठेवुन महेंद्र शेठ दळवी हे माझे बंधुआसलयाने मी या मंचावर आले आहे...

 दळवी यांचा पक्ष वाढतोय आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुखाची,समृद्धीची, प्रसिध्दिची आणी विकास कामांच्या गतीची जावी अशी शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचा कौतुक सोहळा पाहण्या साठी आले आहे...

मी ज्यावेळेस पक्षप्रवेश करेन त्यावेळेस जनतेस सांगून पक्ष प्रवेश करेन असेही सौ सिनकर मॅडम म्हणाल्या.. 

 चणेरा विभागात एकेकाळी राजिपचे माजी अध्यक्ष भाई साहेब पाशीलकर आणि राजिपच्या माजी सदस्या वैशाली सिनकर मॅडम यांनी चणेराविभागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न,सुखात दुखात जाने, विकास कामे, रुग्णालयात जाऊन रुग्णांनाची काळजी घेणे अश्या परिस्थितीत सामन्यांमध्ये वेळोवेळी समाजसेवा करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून चणेराची ओळख झाली होती...

 त्यानंतर चणेराविभागात नवीन नेते मंडळींकडून राष्ट्रवादी पक्षात गावागावात गट तयार केल्याने भाई पाशीलकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला...

 खैरेखुर्द मुस्लिम समाज अध्यक्ष आजीम अ.कादीर धनसे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या खोट्या आश्वासनांवर पूर्णविराम लावत खैरेखुर्द गावाचा डांबरीकरण रस्ता आणी जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची कॉलेटी कंट्रोल करुन चौकशीअंत कारवाई होण्यासाठीचा निवेदन आ. महेंद्रशेठ दळवी यांना देऊन खैरेखुर्द गावाचा विकास अमदार दळवीच करतील आशी आश्या व्यक्त केली...

 तसेच न्हावे गावचे समाज सेवक चौलकर यांनी केलेल्या भाषणात म्हणाले, राजिप  सदस्यपदाच्या निवडणुकीत भाई पाशीलकर यांच्या पराभवानंतर नको त्यांच्या हातात चणेराविभागाचे नेतृत्व गेल्याने हे पाप आज आम्ही भोगत असलेल्याचे या परिवर्तन विकासाचे कार्यकर्ते मेळाव्यात चौलकर यांनी जाहीर केले...

शिंदेगटाचे रोहा तालुका प्रमुख ऍड मनोजकुमार शिंदे यांनी खांबेरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या उमेदवारीत राष्ट्रवादी (अजित पवार गट)करुन फसवणूक झाल्यानंतर शिंदे यांनी चणेरा मिशन सुरु केला...

 आजच्या या मेळाव्यात खारीपासुन ते पारंगखार पर्यंतच्या गावागावात जाऊन भाई पाशीलकर यांच्या नंतर ऍड मनोजकुमार शिंदे यांच्यारुपात चणेराविभागाला भाई मिळाले अशी प्रतिक्रिया सामान्यांकडुन उपस्थित होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post