अलिबाग (ओमकार नागावकर)
बोलो जय श्रीराम, जय श्रीराम अश्या घोषणांनी रेवदंडा दुमदुमला
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन व अभिमंत्रण करण्यात आले. अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त प्रस्थान झालेल्या अक्षतांचे रेवदंडा गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी रेवदंड्यातील ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभागी होवून प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. यावेळी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच मंदाताई बळी, ग्रामपंचायत सदस्य तसेच रेवदंड्यातील व्यावसायिक, मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते...
कलश यात्रेस युवा तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला, मिरवणुकीच्या सुरुवातीला जय श्रीराम, जय जय श्रीराम अश्या घोषणा देत रेवदंडा पारनाका ते चौल नाका मोटार सायकल रॅली काढण्यात आली, रेवदंड्यातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथे प्रभू श्री राचंद्रांची तसेच प्रस्थान झालेल्या अक्षतांचे सांगोपच्चार, विधिवत पद्धतीनें पुजा करण्यात आली. ही कलश यात्रा रेवदंड्यातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिर येथून, रेवदंडा स.रा. तेंडुलकर भैरी गल्ली, पारनाका, गोळास्टॉप, हरेश्र्वर मंदिर व रेवदंडा श्री मारुती मंदिर येथे येवून महाआरती करून मिरवणुक संपन्न करण्यात आली...

